TRENDING:

Nashik News: पार्टीसाठी नेऊन प्रेयसीच्या नवऱ्याची केली हत्या; बापानेही दिली लेकाची साथ

Last Updated:

मुलाने खून केल्याचं समजल्यानंतरही पुत्रप्रेम आडवं आल्याने बापाने पुरावा नष्ट करण्यासाठी मुलाची मदत केली. यामुळे पोलिसांनी वडील आणि मुलगा दोघांना खुनाच्या गुन्ह्यात अटक केली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
लक्ष्मण घाटोळ, नाशिक 14 सप्टेंबर : नाशिकमधून हत्येचं एक प्रकरण समोर आलं होतं. आता नाशिकरोडच्या पंचक येथील खून प्रकरणाचा खुलासा करण्यात पोलिसांना यश आलं आहे. प्रेमात अडथळा निर्माण होऊ नये म्हणून प्रियकराने प्रेयसीच्या पतीची हत्या केल्याचं समोर आलं. आरोपीने प्रेयसीच्या नवऱ्याला आडरानात पार्टीसाठी नेलं आणि तिथेच त्याची हत्या केली. विशेष म्हणजे या प्रकरणात पुरावे नष्ट करण्यासाठी आरोपीच्या वडिलांनीही त्याची मदत केली.
नाशिक हत्या प्रकरणात बापलेकाला अटक
नाशिक हत्या प्रकरणात बापलेकाला अटक
advertisement

मुलाने खून केल्याचं समजल्यानंतरही पुत्रप्रेम आडवं आल्याने बापाने पुरावा नष्ट करण्यासाठी मुलाची मदत केली. यामुळे पोलिसांनी वडील आणि मुलगा दोघांना खुनाच्या गुन्ह्यात अटक केली. त्यांना न्यायालयाने सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. मयत ज्ञानेश्वर गायकवाड याची पत्नी साधना आणि त्यांच्या जवळच राहणारा कार्तिक कोटमे यांचं प्रेमप्रकरण सुरू होतं.

Crime News : आईच्या उपचारासाठी पैशाची चणचण; अल्पवयीन मुलाचे अपहरण; पुणे पोलिसांनी काही तासांत लावला छडा

advertisement

मयत ज्ञानेश्वर याला प्रेम प्रकरण समजेल आणि त्यामुळे आपलं फिरणं आणि बोलणं बंद होईल, याची भीती मनात असल्याने कार्तिक याने महिलेच्या पतीला रस्त्यातून बाजूला करण्याचं ठरवलं. त्यासाठी कार्तिकने पंचक येथील मलनिस्सारन जवळील जंगल भागात ज्ञानेश्वर गायकवाड याला पार्टीसाठी बोलावून दारू पाजली. यानंतर त्याच्या छातीवर, पोटावर तीक्ष्ण हत्याराने वार करून खून केला. नंतर कार्तिकने घाबरून वडील सुनील पोपट कोटमे याला याबाबत सांगितलं.

advertisement

सुनील पोपट कोटमे याने मुलाला पोलिसांच्या ताब्यात देण्याऐवजी पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. आरोपीच्या वडिलांनी घरी ओटा बनवण्याच्या कामासाठी आणलेलं सिमेंट रिक्षात नेऊन ज्ञानेश्वर गायकवाड यांच्या मृतदेहावर पसरून देत पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. आठ दिवसांनी खुनाची उकल झाल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास वांजळे यांनी क्लिष्ट गुन्ह्याचा तपास सुरू केला. यानंतर प्रियकर कार्तिक आणि त्याला पुरावा नष्ट करण्यासाठी मदत करणारा त्याचा बाप सुनील कोटमे यांना अटक केली आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/नाशिक/
Nashik News: पार्टीसाठी नेऊन प्रेयसीच्या नवऱ्याची केली हत्या; बापानेही दिली लेकाची साथ
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल