समोर आलेल्या माहितीनुसार, संरक्षण कठाडे तोडून कार खोल दरीत कोसळली आहे. या घटनेत सप्तश्रृंगी मातेचं दर्शन घेऊन घराकडे परतणाऱ्या पाच भाविकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि आपत्ती व्यवस्थापन पथकांकडून घटनास्थळी धाव घेण्यात आली आहे. बचावकार्य सुरू असून मात्र ही दरी खोल असल्यामुळे बचाव कार्यात अडथळे निर्माण होत आहे.
advertisement
पटेल कुंटुंबावर दु:खाचा डोंगर
आज रविवार असल्याने पटेल कुटुंब हे दर्शनासाठी सप्तशृंगगडवर गेले होते. दर्शन घेतल्यानंतर गडावरून खाली परतताना हा अपघात झाला आहे. अपघातात मृत पडलेल्य सर्व व्यक्ती या ५०- ६० वर्षे वयोगटातील आहेत. पटेल कुटुंबीय हे नाशिकच्या पिंपळगाव येथील आहे. कारमध्ये एकूण सहा व्यक्ती असून या सर्व मृत झाल्या आहेत. या घटनेने पटेल कुंटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
मृत व्यक्तींची नावे खालीलप्रमाणे :
किर्ती पटेल (50 वर्षे)
रशिलापटेल (50 वर्षे)
विठ्ठल पटेल (65 वर्षे)
लता पटेल (60 वर्षे)
पचन पटेल (60 वर्षे)
मनी बेन पटेल (70 वर्षे)
दरीत कोसळलेल्या इनोव्हा कार प्रचंड वेगात असावा असा अंदाज व्यक्त होतोय. कारण कारचा पूर्ण चक्काचूर झाला आहे.
