TRENDING:

अशोक खरातचा आणखी एक कांड, बड्या लोकांची लफडी जुळवायचा, संबंध ठेवायला लावायचा अन्...

Last Updated:

नाशिकचा लंपट अंकशास्त्रज्ञ अशोक खरात उर्फ 'कॅप्टन' याच्या काळ्या कृत्यांची मालिका वाढतच चालली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नाशिकचा लंपट अंकशास्त्रज्ञ अशोक खरात उर्फ 'कॅप्टन' याच्या काळ्या कृत्यांची मालिका वाढतच चालली आहे. त्याच्याविरोधात एका विवाहित महिलेनं लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला. यानंतर नाशिक पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत. आरोपी मागील दोन वर्षांपासून तिचं लैंगिक शोषण करत होती. पती मरेल, मी तुला बरबाद करेन, अशी धमकी देऊन आरोपी तिच्यावर अत्याचार करत होता. आता या प्रकरणातील अनेक खुलासे समोर येत आहेत.
अशोक खरात
अशोक खरात
advertisement

अशोक खरातचे काळे कृत्य बाहेर काढणारे 'खबरदार पुढारी' दैनिकाचे संपादक दत्तात्रय खेमनार यांनी आता नवीन खुलासे केले आहेत. एका मराठी यूट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी भोंदूबाबा अशोक खरातच्या अघोरी कृत्यांचा पाढा वाचला आहे. खरातने केवळ महिलांचे शोषणच केले नाही, तर 'योनी शुद्धीकरणा'च्या नावाखाली अत्यंत अमानवीय कृत्ये केल्याचा दावा खेमनार यांनी केला आहे.

advertisement

उच्चशिक्षित आणि राजकारणी महिला रडारवर

दत्तात्रय खेमनार यांनी केलेल्या दाव्यानुसार, खरातच्या जाळ्यात अडकलेल्या महिला या सामान्य नसून त्या उच्चशिक्षित, सरकारी अधिकारी आणि मोठ्या राजकीय घराण्यातील आहेत. "मी देव आहे आणि तुझे आयुष्य सुधारायचे असेल तर मला तुझे योनी शुद्धीकरण करावे लागेल," असे सांगून तो महिलांना स्वतःचे मूत्र प्यायला लावायचा, असा खळबळजनक आरोप खेमनार यांनी केला आहे.

advertisement

२० कोटींची वसुली आणि 'प्रेग्नन्सी'चा बनाव

खरात हा केवळ भोंदूगिरीच करत नव्हता, तर तो एक सराईत गुन्हेगार आणि ब्लॅकमेलर देखील होता. एका मोठ्या उद्योजकाचे दुसऱ्या महिलेशी संबंध जुळवून दिले. त्यांना शरीरसंबंध ठेवायला भाग पाडलं. यानंतर ती महिला गर्भवती असल्याचं खोटं सांगून खरातने त्या उद्योजकाकडून तब्बल २० कोटी रुपये उकळल्याची माहिती देखील खेमनार यांनी दिली आहे. अशा प्रकारे त्याने अनेकांना जाळ्यात ओढून कोट्यवधींची माया जमवली असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

advertisement

व्यावसायिकांचीही मोठी फसवणूक

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
Summer Recipe: उन्हाळ्यात काहीतरी चवदार खायचंय? झटपट बनणाऱ्या या कांदा चटणीपुढे पनीरही फिकं, VIDEO
सर्व पहा

केवळ महिलाच नव्हे, तर उद्योजकही खरातच्या निशाण्यावर होते. व्यवसायात तोटा झालेल्या एका व्यापाऱ्याला त्याने साडेतीन लाख आणि दोन लाख रुपयांना खोटी रत्ने विकून साडेपाच लाखांचा गंडा घातला. खरातच्या संपर्कात येणाऱ्या स्त्री-पुरुषांना तो एकमेकांशी लैंगिक संबंध ठेवण्यास प्रवृत्त करायचा आणि त्यानंतर त्यांचे व्हिडिओ बनवून त्यांना आयुष्यभर ब्लॅकमेल करायचा, असा दावाही खेमनार यांनी केला आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/नाशिक/
अशोक खरातचा आणखी एक कांड, बड्या लोकांची लफडी जुळवायचा, संबंध ठेवायला लावायचा अन्...
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल