TRENDING:

चौकशी सुरू असतानाच 3 महिला समोर, अशोक खरात पुरता अडकला, एजंटही ताब्यात

Last Updated:

नाशिकमधील बहुचर्चित अशोक खरात प्रकरणात आता दररोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. एसआयटी पथकानं केलेल्या तपासात खरातचे अनेक काळे धंदे समोर आले आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नाशिकमधील बहुचर्चित अशोक खरात प्रकरणात आता दररोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. एसआयटी पथकानं केलेल्या तपासात खरातचे अनेक काळे धंदे समोर आले आहेत. पथकाने त्याच्याकडील संपत्तीचे आणि फसवणुकीच्या जाळ्याचा देखील पर्दाफाश केला आहे. आता अशोक खरात विरोधात तक्रार देण्यासाठी आणखी तीन महिला समोर आल्या आहेत. यामुळे खरातच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे.
ashok kharat nashik news
ashok kharat nashik news
advertisement

आणखी तीन पीडित महिलांची तक्रार

एसआयटी पथकाने पीडित महिलांना विश्वासात घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. त्यानंतर या तिन्ही महिला अशोक खरात विरोधात अधिकृत तक्रार देण्यासाठी तयार झाल्या आहेत. खरातने केवळ आध्यात्मिक भीती दाखवूनच नाही, तर आर्थिक आणि मानसिक फसवणूक केल्याचा आरोपही या महिलांनी केला आहे. तक्रार देण्यासाठी तीन महिला समोर आल्याने खरातविरुद्धचा गुन्हा अधिक भक्कम होणार आहे.

advertisement

मालमत्तेचा आकडा पाहून पोलीसही चक्रावले

तपासादरम्यान एसआयटीने खरातची संपूर्ण 'कुंडली' बाहेर काढली आहे. यामध्ये त्याच्या नावावर असलेल्या संपत्तीचा मोठा पसारा उघड झाला आहे. खरातच्या नावावर तब्बल ५२ सातबाऱ्यांची नोंद आढळली आहे. त्याने नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यात जमिनी खरेदी करत मोठं साम्राज्य उभं केलं आहे. यात सिन्नर, गंगापूर आणि नाशिक शहर परिसरातील मोक्याच्या जमिनींचा समावेश आहे. ५२ पैकी ११ मालमत्ता पूर्णपणे खरातच्या एकट्याच्या नावावर आहेत, तर इतर मालमत्तांमध्ये तो सामाईक भागीदार आहे.

advertisement

मोठ्या अधिकाऱ्यांशी लागेबांधे?

सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, खरातच्या सामाईक सातबाऱ्यांवर अनेक बड्या सरकारी अधिकाऱ्यांच्या नातेवाईकांची नावं असल्याची चर्चा सुरू आहे. यामुळे हे प्रकरण केवळ एका भोंदू बाबापुरते मर्यादित नसून, यात मोठे रॅकेट असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. खरातचे जमीन व्यवहार सांभाळणारा एजंटदेखील आता पोलिसांच्या ताब्यात आहे.

आयकर विभागाची एन्ट्री

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
APMC Market: द्राक्षं, केळीचं मार्केट हाललं; कांदा, लिंबूला शनिवारी किती मिळाला भाव?
सर्व पहा

फसवणुकीतून जमा केलेल्या या कोट्यवधींच्या मालमत्तेची दखल आता आयकर विभागाने देखील घेतली आहे. पोलिसांच्या अहवालानंतर आयकर विभाग खरातच्या सर्व मालमत्तांचा सखोल तपास करणार आहे. या जमिनी खरेदी करण्यासाठी पैसे कोठून आले आणि व्यवहारातील संशयास्पद नोंदींचा छडा लावला जाणार आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/नाशिक/
चौकशी सुरू असतानाच 3 महिला समोर, अशोक खरात पुरता अडकला, एजंटही ताब्यात
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल