TRENDING:

अशोक खरातचे अश्लील VIDEO पटकन डिलीट करा, पोलीस ॲक्शनमोडमध्ये, तिघांवर गुन्हा दाखल

Last Updated:

नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात याचे अनेक अश्लील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. हे व्हिडीओ व्हायरल केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
लक्ष्मण घाटोळ, प्रतिनिधी नाशिक: नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात याचे अनेक अश्लील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ज्यात तो काही विवाहित महिला आणि तरुणींसोबत अघोरी विधी करायच्या नावाखाली अश्लील कृत्य करताना दिसत आहे. अशोक खरातच्या लैंगिक शोषणाचे हे व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता पोलीस प्रशासन अॅक्शनमोडवर आले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी पहिला गुन्हा दाखल केला आहे.
अशोक खरात प्रकरणातील व्हिडीओ व्हायरल करणाऱ्यांवर पहिला गुन्हा दाखल
अशोक खरात प्रकरणातील व्हिडीओ व्हायरल करणाऱ्यांवर पहिला गुन्हा दाखल
advertisement

लैंगिक शोषण प्रकरणातील महिलांचे व्हिडीओ व्हायरल केल्याप्रकरणी आणि महिलांची ओळख उघड केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अहिल्यानगर जिल्ह्याच्या कोपरगावमधील राहुल शिंदे आणि योगेश आढावसह बीडमधील संदीप गरजे या तीन व्यक्तींच्या विरोधात अहिल्यानगर पोलिसात गुन्हा दाखल दाखल केला आहे. या तीनही संशयित आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांच्या स्वतंत्र टीम रवाना झाल्या आहेत.

advertisement

पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम २९४ (२), ३ (५) सह माहिती तंत्रज्ञान कायदा २००० चे कलम ६७ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. यातील संशयित आरोपी राहुल शिंदे याला त्याचा मित्र योगेश आढावने तर योगेश आढाव याला बीड जिल्ह्यातील माजलगाव मधील संदीप गरजे याने हे व्हिडिओ पाठवल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. पोलिसांनी व्हिडिओ पाठवणाऱ्यांची साखळीच उघडकीस आणली आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
लिंबू उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, दरात झाली वाढ, केळीला काय मिळाला भाव?
सर्व पहा

हा गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी अशोक खरात प्रकरणाचे व्हिडीओ व्हायरल करणाऱ्यांना इशारा दिला आहे. कोणाकडेही पीडित महिलेची ओळख, तिच्या नातेवाईकांची ओळख, तिच्या घराची, तिच्या कुटुंबीयांची ओळख उघड होईल, असे व्हिडीओ किंवा अश्लील व्हिडीओ असल्यास तत्काळ डिलिट करावेत. सोशल मीडियावर प्रसारीत करू नये. असे व्हिडीओ प्रसारीत केल्यास संबंधितांवर आणि ग्रुप अॅडमीनवर गुन्हा दाखल करण्यात येईल. तसेच त्यांना अटक करून कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/नाशिक/
अशोक खरातचे अश्लील VIDEO पटकन डिलीट करा, पोलीस ॲक्शनमोडमध्ये, तिघांवर गुन्हा दाखल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल