TRENDING:

MHADA HOME: म्हाडाचं घर फक्त 14 लाखांपासून; नाशिकच्या 'या' प्राईम लोकेशनवर हक्काचं घर मिळणार

Last Updated:

MHADA Nashik Lottery : नाशिकमध्ये म्हाडाकडून 14 ते 36 लाखांच्या किमतीतील स्वस्त घरे उपलब्ध होणार आहेत. ही घरे नक्की कोणत्या भागात उपलब्ध असणार आहेत त्याविषयी सविस्तर जाणून घेऊयात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नाशिक : हक्काच्या घराचं स्वप्न आता पूर्ण होणार आहे, कारण म्हाडाच्या नाशिक मंडळातर्फे नाशिक शहरातील विविध परिसरातील 402 घरे अ‍ॅडव्हान्स कंट्रिब्यूशन तत्त्वावर विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या घरांसाठी लवकरच लॉटरी काढली जाणार असून घरांच्या किमती सुमारे 14 लाख 94 हजार ते 36 लाख 75 हजार रुपयांच्या दरम्यान आहेत.
News18
News18
advertisement

कोणत्या परिसरात उपल्बध असणार आहेत ही घर?

ही घरे चुंचाळे, पाथर्डी, मखमलाबाद, आडगाव आणि सातपूर शिवारातील चालू गृहनिर्माण प्रकल्पांमध्ये असणार आहे. मात्र त्यासाठी वांद्रे येथील म्हाडा मुख्यालयात या लॉटरीसाठी ऑनलाइन अर्ज नोंदणीची प्रक्रिया सोमवारी सुरू झाली. या कार्यक्रमाला म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल उपस्थित होते. त्यांनी सांगितले की, 2025 मध्ये नाशिक मंडळाकडून ही चौथी लॉटरी असून याआधीच्या तीन लॉटरींमध्ये मिळून 846 घरे उपलब्ध करण्यात आली आहेत. नागरिकांना परवडणारी घरे मिळावीत यासाठी म्हाडाचा प्रयत्न सुरू आहे.

advertisement

अ‍ॅडव्हान्स कंट्रिब्यूशन तत्त्व म्हणजे या लॉटरीत समाविष्ट केलेली घरे अद्याप बांधकाम प्रक्रियेत आहेत. लॉटरीत नाव निघालेल्या नागरिकांना घराची पूर्ण किंमत पाच वेगवेगळ्या हप्त्यांमध्ये भरता येणार आहे.

कुठे किती घरे उपलब्ध?

अल्प उत्पन्न गटासाठी (EWS/LIG):

चुंचाळे शिवार – 138 घरे

पाथर्डी शिवार – 30 घरे

मखमलाबाद – 48 घरे

आडगाव शिवार – 77 घरे

advertisement

एकूण : 293 घरे

मध्यम उत्पन्न गटासाठी (MIG):

सातपूर शिवार – 40 घरे

पाथर्डी शिवार – 35 घरे

आडगाव शिवार – 34 घरे

एकूण : 109 घरे

अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे

अर्जदारांनी 1 एप्रिल 2024 ते 31 मार्च 2025 दरम्यानच्या उत्पन्नाचा पुरावा सादर करणे बंधनकारक आहे. त्यासाठी खालीलपैकी कुठलाही एक दस्तऐवज मान्य असेल

advertisement

1)आयकर विवरणपत्र (ITR)

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीनच्या दरात चढ-उतार, कांदा आणि मक्याला आज काय मिळाला भाव? Video
सर्व पहा

2)तहसील कार्यालयाकडून मिळणारे उत्पन्न प्रमाणपत्र या कागदपत्रांच्या आधारे अर्जदार पात्रतेची पडताळणी केली जाणार आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/नाशिक/
MHADA HOME: म्हाडाचं घर फक्त 14 लाखांपासून; नाशिकच्या 'या' प्राईम लोकेशनवर हक्काचं घर मिळणार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल