दरम्यान, नाशिककरांच्या जीवाशी खेळ करण्याचा प्रकारही उघडकीस आला आहे. नाशिकच्या सातपूर परिसरातील जलवाहिनीत थेट मेलेल कबूतर आढळल्याचे काही फोटो सभागृहात दाखवण्यात आले. नाशिक मनपाच्या सातपूरच्या प्रभाग क्रमांक 10 मध्ये हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी नगरसेवक विश्वास आप्पा नागरे आणि माधुरी बोलकर आक्रमक झाले. त्यांनी नागरिकांच्या जीविताशी सुरू असलेल्या खेळ थांबवण्याची मागणी केली.
advertisement
नाशिक महानगरपालिकेच्या विशेष महासभेत शहरातील विस्कळीत पाणीपुरवठा आणि शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांवरून नगरसेवकांचा संताप पाहायला मिळाला. यावेळी सातपूरच्या प्रभाग 10 मधील एका जलकुंभात चक्क मेलेलं कबूतर आढळल्याची धक्कादायक आरोप पालिकेच्या सभागृहात स्थानिक नगरसेवकांनी केला. या वेळी त्यांनी महापौरांना पिण्याच्या पाण्याच्या पाइपलाइन मधून काढलेल्या मेलेल्या कबुतराचा फोटो दाखवत कारवाईची मागणी केली.
दरम्यान नाशिक महानगरपालिका पाणीपुरवठा विभागाच्या या गलथान कारभारावरून नगरसेवकांनी पालिका प्रशासनाला चांगलच धारेवर धरलं. या दूषित पाण्यामुळे पालिकेचा हा कारभार नागरिकांच्या जीविताशी खेळण्याचा प्रकार असल्याची भावना व्यक्त केली. आता या सगळ्या वर प्रशासन काय करणार हे बघणं महत्त्वाचं आहे.
