advertisement

Success Story: नोकरी करायची की व्यवसाय? यज्ञेशनं निर्णय घेतला, आता फेमस ब्रँड अन् लाखात कमाई, Video

Last Updated:

Success story: घरातून सुरू झालेला हा छोटासा व्यवसाय पुढे ‘पोटली बाबा’ या रेस्टॉरंटपर्यंत पोहोचला. आज बोरिवलीत “पोटली बाबा” हे चांगल्या रेटिंगचं मराठमोळं रेस्टॉरंट म्हणून ओळखलं जातं.

+
Success

Success Story: नोकरी करायची की व्यवसाय? यज्ञेशनं निर्णय घेतला, आता फेमस ब्रँड अन् लाखात कमाई, Video

मुंबई : “नोकरी करायची की स्वतःचा व्यवसाय उभा करायचा?” हा प्रश्न अनेक तरुणांच्या मनात असतो. पण जिद्द, कष्ट आणि आपल्या मातीच्या चवीवर विश्वास असेल, तर स्वप्न नक्की पूर्ण होतात, हे सिद्ध करून दाखवलं आहे बोरिवलीतील तरुण उद्योजक यज्ञेश  सातार्डेकर यांनी. साध्या 16 हजार रुपयांच्या पगारावर करिअरची सुरुवात करणारा हा तरुण आज “पोटली बाबा” या आपल्या मराठमोळ्या मालवणी रेस्टॉरंटमुळे ओळखला जातो.
स्वयंपाकाची आवड, कोकणातील अस्सल मालवणी चव आणि लॉकडाऊनसारख्या कठीण काळातही न हार मानणारी जिद्द — या सगळ्यांच्या जोरावर यज्ञेशने घरातून सुरू केलेलं छोटंसं क्लाऊड किचन आज बोरिवलीतील लोकप्रिय रेस्टॉरंटमध्ये रूपांतरित केलं आहे. त्याचा हा प्रवास अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
advertisement
बारावीनंतर स्वप्नांची सुरुवात
यज्ञेशने बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण केल्यानंतर हॉटेल मॅनेजमेंटमध्ये जायचं ठरवलं. लहानपणापासूनच त्याला स्वयंपाकाची खूप आवड होती. हीच आवड पुढे त्याने करिअर म्हणून निवडली. त्याने चेन्नई येथील इन्स्टिट्युट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट मधून शिक्षण घेतले.
शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याने केवळ 16 हजार रुपयांच्या पगारावर पहिली नोकरी सुरू केली. त्यानंतर ‘सयाजी हॉटेल्स’ सारख्या नामांकित हॉटेल्समध्ये काम करत त्याने वेगवेगळे पदार्थ शिकले. इटालियन डिशपासून ते फाईव्ह स्टार हॉटेलमधील स्वयंपाकघराचा अनुभव त्याने घेतला. शेफ म्हणून त्याची चांगली ओळख तयार झाली.
advertisement
मोठ्या हॉटेलमध्ये काम करत असतानाही त्याच्या मनात एक गोष्ट सतत येत होती — आपल्या कोकणातील, मालवणी चवीला हवी तशी जागा मिळत नाही. व्यवसाय सुरू करण्याचा विचार होता, पण चांगल्या नोकऱ्या मिळत गेल्यामुळे तो निर्णय पुढे ढकलला गेला.
फोटोग्राफीकडे वळलेलं आयुष्य
मुंबईत नोकरी करताना त्याला फोटोग्राफीची आवड लागली. हळूहळू त्याने पूर्णपणे फोटोग्राफीमध्ये करिअर सुरू केलं. जवळपास 600 लग्नांचे फोटोशूट करत त्याने या क्षेत्रातही स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. सगळं सुरळीत सुरू असतानाच लॉकडाऊन आला आणि फोटोग्राफीचा व्यवसाय पूर्णपणे बंद पडला.
advertisement
लॉकडाऊनमध्ये सुरू झालं क्लाऊड किचन
उत्पन्नाचे मार्ग बंद झाल्यानंतर यज्ञेशने पुन्हा आपल्या हाताच्या चवीवर विश्वास ठेवला. त्याने आपल्या इमारतीतून छोट्या प्रमाणात क्लाऊड किचन सुरू केलं. पहिली बिर्याणीची ऑर्डर घेतली, पण चुकून पुलाव तयार झाला. सुरुवातीलाच चूक झाली, तरी त्याने हार मानली नाही.
हळूहळू त्याने अस्सल मराठमोळे आणि मालवणी पदार्थ बनवायला सुरुवात केली. कोकणातील असल्यामुळे मासे बनवण्यात त्याला खास हातखंडा होता. त्याच्या फिश डिशेसना लोकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळू लागला.
advertisement
‘पोटली बाबा’ची चव लोकांपर्यंत
घरातून सुरू झालेला हा छोटासा व्यवसाय पुढे ‘पोटली बाबा’ या रेस्टॉरंटपर्यंत पोहोचला. आज बोरिवलीत “पोटली बाबा” हे चांगल्या रेटिंगचं मराठमोळं रेस्टॉरंट म्हणून ओळखलं जातं. इथे मालवणी थाळीला “पोटली” असं वेगळं नाव दिलं आहे. व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही प्रकारचे अस्सल कोकणी पदार्थ इथे मिळतात. सुरुवातीपासूनच परवडणाऱ्या दरात चांगलं जेवण देण्यावर त्याचा भर आहे.
advertisement
लोकप्रिय मराठी शो महाराष्ट्राची हास्य जत्रा मधील कलाकारांनीही “पोटली बाबा”च्या चवीचं कौतुक केलं. त्यानंतर मोठमोठ्या कार्यक्रमांसाठी ऑर्डर्स येऊ लागल्या आणि त्याची मालवणी चव आणखी लोकांपर्यंत पोहोचली.
आज एकेकाळी 16 हजार रुपयांवर नोकरी करणारा यज्ञेश सातार्डेकर आपल्या “पोटली बाबा” या रेस्टॉरंटमधून महिन्याला सुमारे 15 लाखांची उलाढाल िुकरत आहे. पत्नीची साथ, स्वतःची मेहनत आणि आपल्या मातीच्या चवीवर असलेला विश्वास यामुळे त्याने हा यशस्वी प्रवास घडवून आणला आहे.
view comments
मराठी बातम्या/मनी/
Success Story: नोकरी करायची की व्यवसाय? यज्ञेशनं निर्णय घेतला, आता फेमस ब्रँड अन् लाखात कमाई, Video
Next Article
advertisement
पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार, कोणालाच माहिती नाही भारताचा 'बॅकअप प्लॅन'
पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार
  • पेट्रोल-डिझेलच्या साठ्याबाबत मोठी अपडेट

  • जाणून घ्या किती दिवस पुरेल तेलसाठा

  • भारताचे 'ऑईल सिक्रेट' पहिल्यांदाच कळाले

View All
advertisement