advertisement

Maharashtra Budget 2026 : बळीराजा सुखावला! फडणवीस सरकारच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा

Last Updated:

Maharashtra Budget 2026 : राज्याचे मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी अर्थसंकल्प सादर करण्याची जबाबदारी घेतली.

Maharashtra Budget 2026
Maharashtra Budget 2026
मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी अर्थसंकल्प सादर करण्याची जबाबदारी घेतली. फडणवीस हे अर्थसंकल्प सादर करणारे राज्यातील पहिले मुख्यमंत्री ठरले आहेत. या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रासाठी मोठी आर्थिक तरतूद करण्यात आली असून शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत.
अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांना काय मिळालं?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या भाषणात म्हणाले की,  राज्याच्या कृषी GDP वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
वसुधा व्हाईस कॉल नोटिस शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात येणार आहे. पशुधन व्यवसायाची व्याप्ती वाढवण्यासाठी मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन संवर्धन योजना सुरू करण्यात येणार आहेत. शेतकऱ्यांसाठी AGRI STACK  योजना सुरू केली आहे.
मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना सुरू करण्यात येणार आहे. या योजनेतून स्थानिक मासळी उत्पादनाला चालना देणे, मत्स्य बाजारांचे आधुनिकीकरण करणे तसेच तलावांचे पुनरुज्जीवन करणे यावर भर दिला जाईल.
advertisement
शेतकऱ्यांसाठी 'शेत पाणंद योजना' सुरू करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री ग्राम सडक योजना पूर्ण करणार. राज्यात नैसर्गिक शेती अभियान सुरू केलं जाणार.
गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेचा लाभ आता शेतमजुरांनाही देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. यामुळे शेतमजुरांना अपघाताच्या प्रसंगी आर्थिक संरक्षण मिळणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
advertisement
कृषी संलग्न केंद्रे आणि ग्रामीण विकासाविषयी बोलताना फडणवीस म्हणाले की, राज्याचा कृषी क्षेत्रातील जीडीपी सन २०४७ पर्यंत ५५ अब्ज डॉलरवरून तब्बल ५०० अब्ज डॉलरपर्यंत नेण्याचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. बळीराजाला केंद्रस्थानी ठेवून शेतीमालाला जागतिक बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी १० ते १५ प्रमुख पिकांसाठी एकात्मिक मूल्यसाखळी उभारण्याचा सरकारचा मानस आहे.
advertisement
तसेच शेतकऱ्यांना विविध सेवा सुलभपणे मिळाव्यात यासाठी महावेद, महाडीबीटी आणि इतर डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून एकात्मिक डिजिटल परिसंस्था उभारण्याचेही उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.
view comments
मराठी बातम्या/कृषी/
Maharashtra Budget 2026 : बळीराजा सुखावला! फडणवीस सरकारच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा
Next Article
advertisement
पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार, कोणालाच माहिती नाही भारताचा 'बॅकअप प्लॅन'
पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार
  • पेट्रोल-डिझेलच्या साठ्याबाबत मोठी अपडेट

  • जाणून घ्या किती दिवस पुरेल तेलसाठा

  • भारताचे 'ऑईल सिक्रेट' पहिल्यांदाच कळाले

View All
advertisement