TRENDING:

Nashik Saptshrungi Gad: सप्तश्रृंगी देवीचे घेता येणार 24 तास दर्शन, कधी आणि काय आहे वेळापत्रक?

Last Updated:

चैत्र नवरात्रोत्सवाच्या काळामध्ये वणीच्या सप्तश्रृंगगडावरील सप्तश्रृंगी देवीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी 24 तास दर्शन सुरू राहणार आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नाशिक: चैत्र नवरात्रोत्सवाच्या काळामध्ये वणीच्या सप्तश्रृंगगडावरील सप्तश्रृंगी देवीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. चैत्र नवरात्रोत्सव येत्या गुढीपाडव्यापासून म्हणजेच 19 मार्चपासून सुरू होणार असून रामनवमीपर्यंत अर्थात 27 मार्चपर्यंत हा उत्सव असणार आहे. या नऊ दिवसांमध्ये वणीतील सप्तश्रृंगी देवीचे दर्शन भाविकांसाठी 24 तास सुरू राहणार आहे. मंदिर ट्रस्टने भाविकांच्या सोयीसाठी घेतलेला महत्त्वाचा निर्णय आहे. या काळामध्ये भाविकांसाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत.
News18
News18
advertisement

नुकतंच मंदिर प्रशासनाच्या झालेल्या नियोजन बैठकीत सप्तश्रृंगी देवीचे मंदिर चैत्र नवरात्रोत्सवाच्या काळात 24 तास खुले ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शिवाय, या काळामध्ये गडावर खासगी वाहनांना बंदीही घालण्यात आलेली आहे. या काळामध्ये येणाऱ्या भाविकांसाठी नांदूरी येथे गाड्या पार्किंगचा निर्णय घेण्यात आला आहे. नवरात्रोत्सवामध्ये महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून भाविक देवीच्या दर्शनासाठी येत असतात. या दिवसांमध्ये भाविक मोठ्या संख्येने येत असतात. यासाठी मंदिर आणि गडाच्या परिसरामध्ये कायदा- सुव्यवस्था, भाविकांसाठीची सुरक्षा, स्वच्छता, वाहतूक आणि आरोग्य सुविधांचे नियोजन करण्यात आले आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
इस्त्रायल-इराण युद्धाचा इंटरनेटला फटका? भारतातील डिजिटल सेवांवर काय होईल परिणाम?
सर्व पहा

गेल्या काही दिवसांपूर्वीच त्र्यंबकेश्वरमधील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक महत्त्वाचा समजल्या जाणाऱ्या या मंदिरामध्ये भाविक आणि सुरक्षा रक्षकांमध्ये झालेला मारहाणीची घटना ताजी असताना सप्तश्रृंगी देवीच्या मंदिरातही भाविकांच्या सुरक्षेसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. नवरात्रीच्या काळामध्ये सप्तश्रृंगी देवीच्या गाभाऱ्यात दर्शनासाठी येणाऱ्या सर्व भाविकांच्या सुरक्षेचा निर्णय घेण्यात आला आहे. फुलविक्रेत्याकडून किंवा इतर कोणत्याही विक्रेत्यांकडून सोबतच मंदिरातील कोणत्याही कर्मचार्‍याकडून भाविकांना मारहण झाली किंवा त्यांना त्रास देण्यात आला तर त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्याचा इशारा कळवणचे पोलीस निरीक्षक खगेंद्र टेंभेकर यांनी दिला आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/नाशिक/
Nashik Saptshrungi Gad: सप्तश्रृंगी देवीचे घेता येणार 24 तास दर्शन, कधी आणि काय आहे वेळापत्रक?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल