नाशिक पोलिसांनी आनंदाने रंग खेळण्यासाठी सांगितले असून कुठेही नियमांचे पालन केले गेले नाही किंवा मर्यादा ओलांडल्यास पोलिसांकडून कारवाई केली जाणार आहे. शहरामध्ये अनेक चौकाचौकांमध्ये डीजे लावला जातो. त्यावेळी आवाजाला कोणतीही मर्यादा नसते. जर मोठ्या प्रमाणावर आवाजाची पातळी असेल तर नाशिक पोलिसांकडून कारवाई केली जाणार आहे. या सर्वांवर नाशिक पोलिसांचा वचक राहणार आहे. त्यामुळे यंदाची रंगपंचमी 'गुलाल'सोबत नाही तर, 'खाकी'च्या कडक पहाऱ्यात साजरी होणार आहे. शिवाय, सणावेळी पोलिसांकडून महिलांच्या सुरक्षेवरही भर दिला जाणार आहे.
advertisement
रहाडच्या वेळी पोलिसांकडून विशेष सुरक्षा ठेवण्यात येणार आहे. त्यावेळी महिलांसोबत गैरप्रकार घडण्याची शक्यता जास्त असते. छेडछाड करणाऱ्या आणि महिलांसोबत गैरवर्तवणुक करणाऱ्या टवाळखोरांची यावेळी काही गय नसणार आहे. संपूर्ण नाशकामध्ये रहाडच्यावेळी सीसीटिव्ही कॅमेऱ्याची नजर असणार आहे. आयोजकांना त्यांच्या इव्हेंटच्या ठिकाणी कॅमेरे बसवणे अनिवार्य असणार आहे. दरम्यान, नाशिकमध्ये रहाड आणि शॉवर डान्ससाठी दुपारी 12 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंतचा वेळ असणार आहे. या काळामध्ये नियम धाब्यावर बसवणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे.
ज्या ठिकाणी रहाडचे आयोजन केले जाणार आहे, तिकडे गैरवर्तवणुक करणार्यांवर 'ऑन द स्पॉट' कारवाई केली जाणार आहे. नाशिकमध्ये रंगपंचमीच्या वेळी नाशिक पोलीस, स्वयंसेवक, दामिनी पथक यांचं गस्त असेल. रहाड आणि शॉवर डान्सच्या भोवती प्रत्येक मंडळाने लाकडी बॅरिकेटिंग लावणे बंधन कारक असणार आहे.
