TRENDING:

शाळेला जाताना शिक्षिकेसोबत भयंकर घडलं, पुलावरून उडून थेट रस्त्यावर, मुलाचा आक्रोश, गाव हळहळलं

Last Updated:

Nashik News: मनिषा निरभवणे या हिंदी विषयाच्या शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. ओझर येथून त्या रोज दुचाकीवरूनच शाळेत ये-जा करत होत्या.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नाशिक: मुंबई-आग्रा महामार्गावरील पिंपळगाव बसवंत येथील टोल प्लाझालगत कादवा नदी पुलावर कार आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात 'मविप्र' संस्थेच्या आदर्श इंग्लिश स्कूलमधील शिक्षिकेचा जागीच मृत्यू झाला. मनीषा देवीदास निरभवणे असे 38 वर्षीय शिक्षिकेचं नाव असून त्या ओझर येथून दुचाकीवरून शाळेत जात होत्या. या घटनेनंतर कुटुंबीयांसह शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थ्यांना अश्रू अनावर झाले.
शाळेला जाताना शिक्षिकेसोबत भयंकर घडलं, पुलावरून उडून थेट रस्त्यावर, मुलाचा आक्रोश, गाव हळहळलं
शाळेला जाताना शिक्षिकेसोबत भयंकर घडलं, पुलावरून उडून थेट रस्त्यावर, मुलाचा आक्रोश, गाव हळहळलं
advertisement

मनीषा निरभवणे या ओझर येथील दत्तनगर परिसरात राहत होत्या. त्यांनी पदवीपर्यंतचं शिक्षण घेतलं असून 2018 पासून त्या पिंपळगाव बसवंत येथील आदर्श इंग्लिश स्कूलमध्ये हिंदी विषयाच्या शिक्षिका म्हणून अध्यापन करत होत्या. ओझर येथून त्या रोज दुचाकीवरूनच शाळेत ये-जा करत होत्या.

नेमकं घडलं काय?

मनीषा या नेहमीप्रमाणे मंगळवारी सकाळच्या सत्रासाठी आठ वाजता घरातून शाळेकडे निघाल्या होत्या. सव्वाआठच्या सुमारास त्या दुचाकीवरून (एमएच 15 केडी 2069) टोल प्लाझा लगत असणाऱ्या कादवा नदीच्या पुलावर आल्या. तेव्हा नाशिकहून मालेगावकडे जाणाऱ्या स्विफ्ट कारने (एमएच 15 जीआर 1631) दुचाकीला जोराची धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये मनीषा दुचाकीवरून हवेत उडाल्या आणि थेट रस्त्यावर पडल्या.

advertisement

Mumbai News : शतपावली करण्यासाठी बाहेर पडणं बेतलं जिवावर, महिलेची निर्घृण हत्या; कारण आले समोर

हेल्मेट घातलेला असतानाही...

मनीषा यांनी हेल्मेट घातलेले होते. तरीही हवेत उडून रस्त्यावर पडल्याने डोक्याला जबर मार लागला. डोके आणि मेंदूतून प्रचंड रक्तस्राव झाला. त्यामुळे त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. या घटनेनंतर महामार्गावरील अपघातांचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून पिंपळगाव पोलिस ठाण्यात कारचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

advertisement

विरुद्ध दिशेने आलेल्या वाहनामुळे...

स्विफ्ट कार आणि दुचाकीचा अपघात पुलावरून समोरून विरुद्ध बाजूने येणाऱ्या वाहनामुळे झाला. समोरून वाहन येत असल्याने मनीषा या दुसऱ्या लेनवर गेल्या. मात्र, त्याचवेळी मागून येणाऱ्या भरधाव कारने दुचाकीला जोराची धडक दिली. त्यामुळे हा अपघात झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

शिक्षक, विद्यार्थ्यांच्या डोळ्यात पाणी

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच ‘मविप्र’ संस्थेचे सरचिटणीस अॅड. नितीन ठाकरे व उपाध्यक्ष विश्वासराव मोरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. मनीषा निरभवणे यांच्या अकाली निधनाने आदर्श इंग्लिश स्कूलमध्ये शोककळा पसरली असून, शिक्षक आणि विद्यार्थ्यांना अश्रू अनावर झाले.

advertisement

आठवीतल्या साईचा आक्रोश

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
नोकरी सोडली,सुरू केला वडापाव व्यवसाय, महिन्याला तब्बल 3 लाख कमाई
सर्व पहा

मनीषा यांच्या मागे पती अॅड. देवीदास निरभवणे व मुलगा साई असा परिवार आहे. आईचे छत्र हरपल्याने आठवीत शिकणाऱ्या साईचा आक्रोश उपस्थितांचे हृदय पिळवटून टाकणारा होता. पती आणि नातेवाईकांवर दु:खाचा डोंगर कोसळल्याने सर्वत्र शोककळा पसल्याचे चित्र होतो. मनीषा निरभवणे यांच्या पार्थिवावर ओझर येथेच शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/नाशिक/
शाळेला जाताना शिक्षिकेसोबत भयंकर घडलं, पुलावरून उडून थेट रस्त्यावर, मुलाचा आक्रोश, गाव हळहळलं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल