TRENDING:

Kumbhmela 2027: नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी काय काय करणार? CM फडणवीसांनी कामांची यादीच वाचली, 'ही कामे होणारच...'

Last Updated:

त्र्यंबकेश्वरमध्ये अमृत स्नानासाठी नवा कोरा घाट बांधण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नाशिक: त्र्यंबकेश्वर आणि नाशिकमध्ये 2027 मध्ये होऊ घातलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली अनेक वेगवेगळ्या कामांना शिखर समितीच्या बैठकीत शुक्रवारी (13 मार्च) मान्यता देण्यात आली. अलीकडेच कुंभमेळा आयुक्त यांनी दैनिक भास्करला दिलेल्या मुलाखतीत नाशिकमधल्या काही कामांची यादीच त्यांनी वाचून दाखवली. त्र्यंबकेश्वरमध्ये अमृत स्नानासाठी सुमारे दोन किलोमीटर लांबीचा नवा कोरा घाट बांधण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. नाशिक कुंभासाठी प्रशासनाने पहिल्यांदाच हा निर्णय घेतला आहे. यासाठी आखाड्यांची संमती घेण्यात आली आहे. यामध्ये आधुनिक सुविधा पुरवल्या जाणार आहेत.
News18
News18
advertisement

सिंहस्थ कुंभादरम्यान नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये देशासह जगभरातून करोडो भाविक येण्याची अपेक्षा आहे. दैनिक भास्करला दिलेल्या मुलाखतीत कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह यांनी ही माहिती दिली. मुलाखतीदरम्यान शेखर सिंह यांनी माहिती दिली की, " आतापर्यंत आखाडे पारंपरिक कुशावर्त तीर्थक्षेत्रावर लोकं शाही स्नान करायचे. तिथली मर्यादित जागा आणि गर्दीवर नियंत्रण ठेवण्यात येणाऱ्या अडचणींमुळे, कुशावर्तापासून सुमारे 1 किमी अंतरावर असलेल्या त्र्यंबकेश्वरमध्ये एक नवीन घाट बांधला जात आहे. या घाटावर तीन नवीन तलाव बांधले जातील. तिथे गोदावरी नदीचे शुद्ध पाणी आणण्याची तयारीही सुरू आहे. नवीन घाटांवर ध्वजारोहणही केले जाईल. ऑक्टोबर 2026 च्या अखेरीपासून सुरू होणार्‍या कुंभमेळ्यासाठी नियोजन केले जाणार आहे. "

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
APMC Market: द्राक्षं, केळीचं मार्केट हाललं; कांदा, लिंबूला शनिवारी किती मिळाला भाव?
सर्व पहा

शेखर सिंह यांनी शेवटी दिलेल्या माहितीनुसार, "साधुग्रामचे क्षेत्र पूर्वी झालेल्या कुंभांपेक्षा यंदा चार पटीने मोठे असणार आहे. सुमारे 377 एकर जमीन संपादित करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. सिंहस्थ उत्सवाचा कालावधी अंदाजे 18 महिने चालणार आहे. गर्दीच्या काळात, अंदाजे दीड कोटी भाविक नाशिकला आणि सुमारे 75 लाख भाविक त्र्यंबकेश्वरला भेट देतील अशी अपेक्षा आहे. खाजगी वाहने शहरापासून सुमारे तीन किलोमीटर अंतरावर पार्क करावी लागतील. यानंतर भाविकांना प्रशासनाच्या बस सेवेचा वापर करता येईल." सध्या नाशिक महापालिकेकडून आणि राज्य सरकारकडून अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर विकास कामे सुरू आहेत. यामुळे मोठ्या प्रमाणावर दोन्हीही शहरांचा कायापालट होताना पाहायला मिळत आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/नाशिक/
Kumbhmela 2027: नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी काय काय करणार? CM फडणवीसांनी कामांची यादीच वाचली, 'ही कामे होणारच...'
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल