इराण आणि इस्रायल दरम्यान सुरू झालेल्या भीषण युद्धामुळे जागतिक इंधन पुरवठा साखळी विस्कळीत होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर भविष्यात उद्भवू शकणारी इंधन टंचाई टाळण्यासाठी कोल्हापूरचे जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यात इंधन वितरणावर मर्यादा घालण्याचे आदेश दिले आहेत. 25 मार्च 2026 पासून तात्काळ प्रभावाने हे निर्बंध लागू करण्यात आले असून आगामी 31 मार्चपर्यंत हे आदेश लागू असणार आहे.
advertisement
काय आहेत नवे निर्बंध?
- दुचाकी वाहने (Two Wheeler) : एका वेळी जास्तीत जास्त 200 रुपयांपर्यंतच पेट्रोल भरता येईल.
- तीनचाकी व चारचाकी वाहने (Foue wheeler) : एका वेळी जास्तीत जास्त 2000 रुपयांपर्यंतच इंधन भरता येईल.
- बाटलीत, कॅनमध्ये पेट्रोल देण्यास बंदी - सुरक्षेच्या कारणास्तव आणि साठेबाजी रोखण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या कॅन, प्लास्टिक बाटल्या किंवा ड्रममध्ये इंधन देण्यास पेट्रोल पंपांना सक्त मनाई करण्यात आली आहे.
31 मार्चपर्यंत निर्बंध
मध्य आशियातील तणावामुळे कच्च्या तेलाचे दर गगनाला भिडले असून पुरवठा मर्यादित होण्याची चिन्हे आहेत. जिल्ह्यात इंधनाचा तुटवडा भासू नये आणि जीवनावश्यक सेवांना इंधन उपलब्ध व्हावे, या उद्देशाने प्रशासनाने हा मार्ग स्वीकारला आहे. 25 ते 31 मार्च या कालावधीत इंधन साठ्याचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेतला जाणार आहे.
पेट्रोल पंपांवर वाहनधारकांच्या लांबच लांब रांगा
जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश धडकताच शहरातील आणि जिल्ह्यातील पेट्रोल पंपांवर वाहनधारकांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत. अनेकांनी आपली टाकी फुल करण्याचा प्रयत्न केला. मात्र नागरिकांनी गोंधळून जाऊ नये, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांकडून करण्यात आले आहे. हे निर्बंध एका वेळी पेट्रोल भरण्यावर आहेत
हे ही पाहा :
