TRENDING:

काळे पडलेले पेढे, काळी फळं, खरातच्या ऑफिसमध्ये काय काय सापडलं? सगळं गौडबंगाल समोर

Last Updated:

भविष्य सांगण्याच्या बहाण्याने महिलांचं लैंगिक शोषण आणि भाविकांची आर्थिक लूट करणाऱ्या भोंदू अशोक खरात याच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
भविष्य सांगण्याच्या बहाण्याने महिलांचं लैंगिक शोषण आणि भाविकांची आर्थिक लूट करणाऱ्या भोंदू अशोक खरात याच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. एसआयटीच्या (SIT) तपासात खरातच्या काळ्या कारनाम्यांचे एकामागून एक धक्कादायक पुरावे समोर येत आहेत. सोमवारी फॉरेन्सिक टीमने खरातच्या ऑफिसची झडती घेतली. यात अनेक संशयास्पद गोष्टी आढळल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे त्याची पोलीस कोठडी आणखी वाढण्याची शक्यता आहे. कोर्टाने त्याला १ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. उद्या त्याला कोर्टात हजर केलं जाईल, यानंतर त्याची कोठडी आणखी वाढण्याची शक्यता आहे.
ashok kharat
ashok kharat
advertisement

ऑफिसमध्ये सापडले संशयास्पद साहित्य

तपासाचा भाग म्हणून पोलिसांनी खरातच्या सील केलेल्या ऑफिसची फॉरेन्सिक टीमद्वारे झाडाझडती घेतली. यावेळी पथकाला अनेक संशयास्पद वस्तू आढळल्या. यामध्ये भक्तांची नावे आणि तपशील असलेली डायरीही जप्त करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, तिथे काळे पडलेले पेढे, काळ्या रंगाची फळे, बनावट खडे, औषधांची बाटली, गुन्ह्याशी संबंधित साहित्य, कागदपत्रं आणि काही तांत्रिक यंत्रे सापडली आहेत. ही सर्व सामग्री पोलिसांनी पुराव्यासाठी ताब्यात घेतली असून, अंधश्रद्धेचा आधार घेऊन तो लोकांना कसा फसवयचा? याचा उलगडा यातून होत आहे.

advertisement

साऊंडप्रूफ केबिन आणि गुन्ह्याचे 'री-क्रिएशन'

अशोक खरात ज्या केबिनमध्ये महिलांना बोलावून त्यांच्यावर अत्याचार करायचा, त्या केबिनची पोलिसांनी सखोल तपासणी केली. धक्कादायक बाब म्हणजे, या ऑफिसला साऊंडप्रूफ काचा आणि दरवाजे बसवण्यात आले होते. आतमध्ये चालणारा प्रकार किंवा ओरडण्याचा आवाज बाहेर जाऊ नये, यासाठी ही व्यवस्था केली होती का? याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी वैज्ञानिक पद्धतीने चाचणी केली. तसेच, एका पीडित महिलेला घटनास्थळी नेऊन 'क्राईम सीन री-क्रिएशन' देखील करण्यात आले.

advertisement

अनेक महिलांचे शोषण आणि आर्थिक फसवणूक

भविष्य सांगण्याच्या नावाखाली खरातने अनेक महिलांना आपल्या जाळ्यात ओढलं होतं. तपासादरम्यान अनेक शोषित महिलांनी धैर्याने पुढे येत खरातच्या अश्लील कृत्यांचा पाढा वाचला आहे. केवळ शारीरिक शोषणच नव्हे, तर 'विधी' करण्याच्या नावाखाली त्याने अनेकांना लाखो रुपयांना गंडा घातल्याचेही समोर आले आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतकऱ्यांसाठी चिंताजनक बातमी, कांदा दर पडलेलेच, लिंबाला काय मिळतोय भाव?
सर्व पहा

एसआयटीने आतापर्यंत गोळा केलेले वैज्ञानिक पुरावे आणि पीडितांचे जबाब अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. खरातच्या या कृत्यांमध्ये आणखी कोणाचे हात गुंतले आहेत का? आणि त्याने फसवणूक केलेली रक्कम कुठे गुंतवली आहे? याचा तपास अद्याप सुरू आहे. उद्या १ एप्रिल रोजी पोलीस खरातची पोलीस कोठडी वाढवून मागणार की त्याला न्यायालयीन कोठडी मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/नाशिक/
काळे पडलेले पेढे, काळी फळं, खरातच्या ऑफिसमध्ये काय काय सापडलं? सगळं गौडबंगाल समोर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल