तसेच रुपाली चाकणकर यांनी अशोक खरातला वाचवण्यासाठी पोलिसांना फोन करून दबाव टाकल्याचा आरोप देखील केला आहे. तसेच चाकणकर आणि खरात यांच्याबद्दल आपल्याला आणखी जास्तीची माहिती असून ते प्रत्यक्षात मुख्यमंत्र्यांना भेटून सांगू, असंही त्यांनी पत्रात म्हटलं आहे. यामुळे आता रुपाली विरुद्ध रुपाली हा वाद वाढत जाण्याची दाट शक्यता आहे.
रुपाली ठोंबरे पाटीलांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात नेमकं काय म्हटलंय?
advertisement
रुपाली ठोंबरे पाटलांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं की, प्रथमतः महाराष्ट्राला काळीमा फासणारे हे सेक्स रॅकेट आपण निडरपणे उघडकीस आणल्याने मी महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींच्या वतीने अभिनंदन करते व आभार मानते. रुपाली निलेश चाकणकर हिचे बलात्कारी भोंदूबाबा कॅप्टन खरात बरोबरचे हितसंबंध संपूर्ण महाराष्ट्राने पहिले आहेत. परंतु मला मिळालेल्या माहिती नुसार सदर प्रकरणामध्ये कॅप्टन खरात हा भोंदूबाबा हे सगळे कांड केवळ महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या सहभागामुळे व पाठिंब्यामुळेच करू शकला आहे. रुपाली चाकणकर यांनी पुण्यासह अनेक ठिकाणी पदाचा दुरुपयोग करून पोलिसांवर दबाव टाकून अनेक खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत. त्याबाबत मी आपणास स्वतंत्र माहिती देईल. तसेच भोंदूबाबाला असे गैरकृत्य करण्यास पाठींबा दिलेला आहे. त्यामुळे रुपाली निलेश चाकणकर हिचे बाबतीत काही महत्वाच्या बाबी मला माहित असून त्यातील अनेक गोष्टींचा उलगडा मी आपल्यासमोर करेल त्यापैकी रुपाली चाकणकर हिचे बाबतीतील काही महत्वाच्या बाबी खालीलप्रमाणे...
१) मागीलवर्षी पत्रकाराने याच भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरात यांचा पर्दाफाश करून त्याच्या गैरकृत्याची बातमी दिल्यानंतर त्याला फोन करून त्याचे विरूद्ध कारवाई करण्याची धमकी देऊन त्यांचे कडून माफीनामा घेतला होता. त्यामुळे सदर भोंदूबाबा हा पूर्वीपासून बलात्कार करत असल्याचे रुपाली चाकणकर यांना माहित होते त्यामुळे प्रथमतः त्यांना ताब्यात घेऊन तपास चालू करणे आवश्यक आहे.
२) दि.२९/१२/२०२५ रोजी नाशिक ग्रामीण वावी पोलीस स्टेशन येथे गुन्हा र. क्र. ४६८/२०२५ हा रुपाली चाकणकर यांनी दाखल करावयास लावला आहे. त्यामध्ये कॅप्टन खरात याचा लैंगिक शोषणाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता तो व्हिडिओ यापुढे व्हायरल होऊ नये व भोंदूबाबा वाचावा याकरिता पोलिसांवर दबाव टाकून सदर गुन्हा दाखल करून भोंदूबाबानी केलेल्या कृत्यांवर पाणी टाकले आहे.
३) शिर्डी पोलीसस्टेशन येथे फोन करून कॅप्टन खरात याला वाचवले. यावरून स्पष्ट दिसते कि, भोंदूबाबा कॅप्टन खरात याच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये रुपाली चाकणकर यांचा प्रत्यक्ष सहभाग आहे. माझी महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींच्या वतीने लाडक्या भावास नम्र विनंती कि, रुपाली चाकणकर यांचेवर कारवाई होण्या इतपत पुरावे असून तिला तात्काळ अटक करून मत्यपरिस्थिती बाहेर आणून पिडीत महिलांना न्याय द्यावा.
