TRENDING:

5 महिने अन् 40 जणांची टीम, अर्जुनचं लग्न गाजवणारी नाशिकची तरुणी कोण? सचिनही झाला फॅन

Last Updated:

गुरुवारी मुंबईच्या वरळी येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर आणि सानिया चंडोक यांचा विवाह सोहळा पार पडला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
गुरुवारी मुंबईच्या वरळी येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर आणि सानिया चंडोक यांचा विवाह सोहळा पार पडला. सचिनच्या मुलाचं लग्न असल्याने हा सोहळा अत्यंत धुमधडाक्यात होईल. मोकार पैसा खर्च केला जाईल, असं बोललं जात होतं. मात्र अत्यंत साधेपणाने मात्र तितकाच मराठी बाणा जपणारं हे लग्न होतं. हे लग्न जरी सचिनच्या मुलाचं असलं तर या लग्नात सगळ्यात जास्त चर्चा झाली ती म्हणजे नाशिकच्या २४ वर्षीय तरुणीची.
News18
News18
advertisement

अर्जुन आणि सानियाचं लग्न पार पडण्याची सगळी जबाबदारी याच तरुणीवर होती. नाशिकची कन्या गेहना जयदीप आलिमचंदानी हिच्या मेहनतीमुळे या हाय-प्रोफाईल लग्नाचं अत्यंत नेटके नियोजन करण्यात यश आलं. लग्नातील नियोजन बघून स्वत: सचिनही गेहनाचा फॅन झाला. त्याने गेहनाला कौतुकाची थाप दिली.

५ महिन्यांची मेहनत आणि सचिनची शाबासकी

गेहना आलिमचंदानी हिने गेल्या ५ महिन्यांपासून आपल्या ४० सहकाऱ्यांसह या भव्य सोहळ्यासाठी दिवसरात्र काम केलं होतं. हा सोहळा इतक्या यशस्वीपणे आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला की, खुद्द सचिन तेंडुलकरने गेहनाच्या पाठीवर शाबासकीची थाप देत "व्हेरी वेलडन गाईज, व्हेरी नाईस" अशा शब्दांत तिचे कौतुक केले.

advertisement

दोन संस्कृतींचा संगम: 'सांज' ते 'साज'

अर्जुन महाराष्ट्रीयन आहे, तर सानिया पंजाबी आहे. त्यामुळे या लग्न सोहळ्यात दोन भिन्न संस्कृतींचा सुरेख संगम पाहायला मिळाला. या लग्नाचा मेहंदी सोहळआ पूर्णपणे पंजाबी पद्धतीने ढोल-ताशांच्या गजरात पार पडला. प्रत्यक्ष लग्नासाठी मात्र मराठमोळा 'साज' चढवण्यात आला होता. १२०० वऱ्हाडींच्या साक्षीने पारंपरिक महाराष्ट्रीयन पद्धतीने सर्व विधी पार पडले.

advertisement

मेनूमध्ये जपला अस्सल मराठी बाणा

पाहुण्यांसाठी अस्सल महाराष्ट्रीयन बेत आखण्यात आला होता. यात वरण-भात, साजूक तुपातील पुरणपोळी, उकडीचे मोदक, आमरस-पुरी, थंडगार ताक आणि दही अशा पदार्थांची रेलचेल होती. खेळाडूंसाठी हा सोहळा एक प्रकारे 'स्ट्रेस बस्टर' ठरला आणि त्यांनी या पाहुणचाराचे तोंडभरून कौतुक केले.

कोण आहे गेहना आलिमचंदानी?

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
उच्चशिक्षित तरुण रमला शेतीत, निवडला मत्स्यपालन व्यवसाय, 60 लाख रुपयांचा नफा
सर्व पहा

गेहना ही नाशिकमधील प्रसिद्ध उद्योजक जयदीप आलिमचंदानी यांची कन्या आहे. तिचे प्राथमिक शिक्षण नाशिकच्या 'विज्डम हायस्कूल'मध्ये झाले. त्यानंतर तिने लंडनमध्ये जाऊन 'थिएटर डिझाईनिंग'चे प्रशिक्षण घेतलं. पुढे मुंबईत इव्हेंट मॅनेजमेंटचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिने प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली. अवघ्या २४ व्या वर्षी तिने थेट तेंडुलकर फॅमिलीच्या शाही सोहळ्याची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/नाशिक/
5 महिने अन् 40 जणांची टीम, अर्जुनचं लग्न गाजवणारी नाशिकची तरुणी कोण? सचिनही झाला फॅन
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल