TRENDING:

विश्वास ठेवला अन् दलदलीत अडकली, जळगावात शिक्षकाकडून विद्यार्थिनीला नरकयातना, 3 वर्षे सुरू होता भयंकर प्रकार

Last Updated:

जळगाव जिल्ह्याच्या धरणगावात शिक्षकी पेशाला काळिमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
विजय वाघमारे, प्रतिनिधी धरणगाव: जळगाव जिल्ह्याच्या धरणगावात शिक्षकी पेशाला काळिमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इथं एका शिक्षकाने आपल्या विद्यार्थिनीचा लैंगिक छळ केला आहे. आरोपी मागील तीन वर्षांपासून पीडित विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण करत होता. आरोपी शिक्षकाने पीडितेचे खासगी फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार करत होता. आरोपीचा त्रास असह्य झाल्यानंतर अखेर तिने ही बाब आपल्या कुटुंबीयांना सांगितली. यानंतर नातेवाईकांनी संबंधित शिक्षकाला बेदम चोप दिला आहे.
शिक्षकाचा विद्यार्थिनीवर अत्याचार
शिक्षकाचा विद्यार्थिनीवर अत्याचार
advertisement

शिक्षकाला चोप देतानाचे काही व्हिडीओ समोर आले असून सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यात काही तरुण आणि पीडित विद्यार्थिनी शिक्षकाला बेदम चोप देताना दिसत आहे. या प्रकरणी पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी नराधम शिक्षकाला अटक केली आहे. राहुल अहिरे असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे.

advertisement

नराधमाने विद्यार्थिनीला कसं अडकवलं जाळ्यात?

जळगाव जिल्ह्यातील धरणगाव इथं ही संतापजनक घटना घडली. येथील एका शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. आरोपी शिक्षक राहुल अहिरे हा पीडित विद्यार्थिनी नववीत असल्यापासून तिचं लैंगिक शोषण करत होता. त्रास असह्य झाल्यामुळे शेवटी पीडित विद्यार्थिनी आणि तिच्या नातेवाईकांनी शिक्षकाला चांगलाच चोप दिला.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
नासाचा पराक्रम, आर्टेमिस-2 चा नवा विक्रम; 54 वर्षांनी काय घडलं? पुणेकर आरुषने Video तून सांगितलं
सर्व पहा

मिळालेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी शिक्षक राहुल अहिरे याने विद्यार्थिनीसोबत गोड बोलून सुरुवातीला मैत्री केली होती. त्यानंतर शारीरिक संबंध प्रस्थापित करत फोटो काढले आणि ते फोटो व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार संबंधांची मागणी केली. हा प्रकार 2022 ते सप्टेंबर 2025 या कालावधीत सुरू असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, संतप्त विद्यार्थिनी आणि तिच्या नातेवाईकांनी संबंधित शिक्षकाला लाथा-बुक्क्या आणि काठीने बेदम चोप दिला आहे. आता या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/नाशिक/
विश्वास ठेवला अन् दलदलीत अडकली, जळगावात शिक्षकाकडून विद्यार्थिनीला नरकयातना, 3 वर्षे सुरू होता भयंकर प्रकार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल