राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जुलैमध्ये विमानतळाची पाहणी केली होती. सर्व कामं सप्टेंबरपर्यंत कामे पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी दिले होते. त्यामुळे विमानतळाच्या उद्घाटनाचा मुहूर्त नवरात्रीत म्हणजे सप्टेंबरमध्ये असेल, अशी चर्चा होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वेळ मिळाल्यास 30 सप्टेंबरला नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू करण्याचा राज्य सरकारचा मानस होता. मात्र, आता हा मुहूर्त किंचित पुढे गेला आहे.
advertisement
Vande Bharat Express: लातूरकरांची प्रतीक्षा संपणार! मुंबई ते लातूर प्रवास 7 तासांत होणार शक्य
समोर आलेल्या माहितीनुसार, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल म्हणाले की, उद्घाटन झाल्यानंतर हे विमानतळ केंद्राच्या सीआयएसएफकडे सोपवण्यात येईल. ही प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी दोन महिन्यांचा कालावधी लागेल. ही प्रक्रिया पूर्ण होताच डिसेंबरमध्ये नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पहिलं विमान उड्डाण होईल.
2 हजार 866 एकर क्षेत्रावर हे आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्यात आलं आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सर्वात अगोदर इंडिगो एअरलाईन्स सेवा देणार आहे. या विमानतळावरून दरवर्षी सुमारे 90 दशलक्ष प्रवासी आणि 3.2 टन मालवाहतूक केली जाईल.
सद्यस्थितीत या विमानतळाचं 94 टक्क्यांहून अधिक कामं पूर्ण झालं आहे. विमानतळ मार्गावर सुरू असलेले रस्ते, उड्डाणपूल, टेकडी, अटल सेतू मार्गाकडे जाणारा मार्ग, धावपट्टी, उभारलेले टॉवर ही कामं झपाट्याने पूर्ण होत आहेत. या विमानतळाचं भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं होतं आणि उद्घाटनही त्यांच्याच हस्ते होणार आहे.
