TRENDING:

Navi Mumbai Mahanagarpalika: नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये रिक्त पदांसाठी भरती, 12 वी उत्तीर्ण मुलांना नोकरीची संधी

Last Updated:

Navi Mumbai Mahanagarpalika Bharti 2025: नवी मुंबई महानगर पालिकेमध्ये तरुणांना नोकरीची संधी आहे. बहुउद्देशीय कर्मचारी (पुरूष) MPW पदासाठी नवी मुंबई महानगर पालिकेकडून नोकर भरती केली जात आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
तरुण वर्गासाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी प्राप्त झाली आहे. सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. नवी मुंबई महानगर पालिकेमध्ये तरुणांना नोकरीची संधी आहे. बहुउद्देशीय कर्मचारी (पुरूष) MPW पदासाठी नवी मुंबई महानगर पालिकेकडून नोकर भरती केली जात आहे. शहरी आरोग्य वर्धिनी केंद्राकरीता रिक्त असलेल्या पदाची भरती जाहीर करण्यात आली आहे. बहुउद्देशीय कर्मचारी (पुरूष) MPW पदासाठी कोणकोणत्या पात्रता, वयोमर्यादा आहेत, जाणून घेऊया
Navi Mumbai Mahanagarpalika: नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये रिक्त पदांसाठी भरती, 12 वी उत्तीर्ण मुलांना नोकरीची संधी
Navi Mumbai Mahanagarpalika: नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये रिक्त पदांसाठी भरती, 12 वी उत्तीर्ण मुलांना नोकरीची संधी
advertisement

बहुउद्देशीय कर्मचारी (पुरुष) पदाकरीता इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. तरी आरोग्य विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी निर्माण झालेली आहे. वर्धिनी केंद्राकरीता रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी अलीकडेच नवीन नोकरभरती जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात नवी मुंबई महानगरपालिका, एकात्मिक आरोग्य कुटुंब कल्याण सोसायटी आणि राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानाद्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे आणि त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती आणि PDF जाहिरात बातमीमध्ये दिली.

advertisement

बहुउद्देशीय कर्मचारी (पुरुष) पदाकरिता विज्ञान शाखेमध्ये 12 वी उत्तीर्ण असण्याची आवश्यकता आहे. शिवाय, पॅरामेडिकल मूलभूत प्रशिक्षण अभ्यासक्रम किंवा स्वच्छता निरीक्षक अभ्यासक्रम अशी शैक्षणिक अर्हता आहे. या पदासाठी कर्मचार्‍यांना मासिक मानधन/ वेतन 18,000/- रुपये निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना वेतन दिले जाणार आहे. खुल्या प्रवर्गासाठी वयोमर्यादा 38 वर्षाची असून राखीव प्रवर्गासाठी वयोमर्यादा 43 वर्षे इतकी आहे. एकूण 40 जागांसाठी ही नोकर भरती केली जाणार असून जात निहाय प्रत्येक जातीसाठी वेगवेगळ्या जागा आहेत. कोणत्या प्रवर्गासाठी किती जागा आहेत, ही माहिती जाणून घेण्यासाठी जाहिरातीची PDF एकदा आवश्यक पाहा.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
दिवाळीला फराळ बनवताय? पदार्थ तेलात की तुपात तळलेले चांगले? महत्त्वाच्या टिप्स
सर्व पहा

कंत्राटी पद्धतीने नोकर भरती होणार असून उमेदवारांना 10 ऑक्टोबर ते 30 ऑक्टोबरपर्यंत नोकर भरती केली जाणार आहे. जाहिरातीच्या PDF मध्ये उमेदवारांना अर्ज देखील उपलब्ध आहे. अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 30 ऑक्टोबर 2025 पर्यंत आहे. तर, अर्ज पाठवण्याचा पत्ता वैद्यकीय आरोग्य अधिकारी, आरोग्य विभाग, 3 रा मजला, नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय, प्लॉट नं. 1, से. 15 ए, किल्ले गावठाण जवळ, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई - 400614 हा आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Navi Mumbai Mahanagarpalika: नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये रिक्त पदांसाठी भरती, 12 वी उत्तीर्ण मुलांना नोकरीची संधी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल