खारघर सेक्टर २० मध्ये बॅगेत जवळपास २० लाख आढळून आले. खारघर पोलीस ठाण्यात संशयितावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोणत्या पक्षाचे पैसे होते याबाबत अद्याप माहिती समोर न आल्याने अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या कॅश बरोबर कोणत्याही पक्षाचे किंवा उमेदवाराचे प्रचार पत्रक नव्हते. निवडणुकीत मतदारांना पैसे वाटण्यासाठी बॅग आणल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. बुधवारी ९ पर्यंत निवडणूक आयोगाची कारवाई सुरू होती.
advertisement
ताडदेवमध्येही पैसे वाटल्याचा आरोप
ताडदेवमधील वॉर्ड क्रमांक २१५ मध्ये पैसे मतदारांना वाटप करण्यात येत असल्याची घटना समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली भाजपचे प्रदीप छेडा, प्रकाश मोरे यांनी हे पैसे वाटप केल्याचा आरोप आहे. मात्र, इमारतीमधील महिलांनी उलट प्रश्न केल्यानंतर या कार्यकर्त्यांनी काढला पळ काढला.
पैसे वाटपावरून डोंबिवलीत भाजप शिवसेनेत राडा
डोंबिवलीत प्रभाग क्रमांक २९ मध्ये शिवसेना विरुद्ध भाजपच्या उमेदवारांमध्ये पालिका निवडणुकीसाठी लढत होत आहे. तुकारामनगर भागातील दशरथ भुवन इमारतीत प्रचारा दरम्यान भाजपच्या कार्यकर्त्यांनी पैसे वाटप केल्याचा आरोप शिवसेनेचे उमेदवार नितीन पाटील, शिवसेनेचे अपक्ष उमेदवार रवी पाटील यांनी केला. दुसरीकडे भाजपने हा आरोप फेटाळला.
