कांद्याचे दर स्थिर, सोयाबीन आणि कापसाला आज काय मिळाला भाव, एका क्लिकवर चेक करा

Last Updated:

14 जानेवारी बुधवार रोजी राज्यातील कृषी बाजारात पुन्हा संमिश्र स्थिती पाहायला मिळाली. काही प्रमुख पिकांच्या दरात वाढ आणि काहींचे दर स्थिर राहिले असून शेतकऱ्यांच्या दृष्टीने बाजारातील हालचाली महत्त्वाच्या ठरत आहेत.

+
Maharashtra

Maharashtra Krushi Market updates 

अमरावती : 14 जानेवारी बुधवार रोजी राज्यातील कृषी बाजारात पुन्हा संमिश्र स्थिती पाहायला मिळाली. काही प्रमुख पिकांच्या दरात वाढ आणि काहींचे दर स्थिर राहिले असून शेतकऱ्यांच्या दृष्टीने बाजारातील हालचाली महत्त्वाच्या ठरत आहेत. सोयाबीन आणि तुरीच्या दरात बदल नोंदवण्यात आले, तर कांद्याचे दर स्थिर असल्याचे चित्र आहे. आज राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये पिकांची आवक कमी झाली असून बाजारभावात चढ-उतार दिसून येत आहेत.
कपाशीच्या दरात किंचित घट
कृषी मार्केट वेबसाईटवरील सायंकाळी 6.30 वाजताच्या रिपोर्टनुसार, आज राज्यातील कृषी मार्केटमध्ये कपाशीची एकूण आवक 13 हजार 223 क्विंटल इतकी झाली. 4 हजार 400 क्विंटल सर्वाधिक आवक वर्धा मार्केटमध्ये झाली. त्याठिकाणी कमीत कमी 7680 तर जास्तीत जास्त 8278 रुपये प्रतिक्विंटल बाजारभाव मिळाला. वर्धा मार्केटमध्ये आलेल्या लांब स्टेपल कपाशीला सर्वाधिक 8325 रुपये बाजारभाव मिळाला. मंगळवारी मिळालेल्या सर्वाधिक दराच्या तुलनेत आज कपाशीच्या दरात किंचित घट झाली आहे.
advertisement
कांद्याचे दर स्थिर
आज राज्यातील कृषी मार्केटमध्ये 1 लाख 16 हजार 779 क्विंटल कांद्याची आवक झाली. यातील अहिल्यानगर मार्केटमध्ये 38 हजार 066 क्विंटल लाल कांद्याची सर्वाधिक आवक झाली. त्याठिकाणी कांद्याला कमीतकमी 200 ते जास्तीत जास्त 2063 रुपये प्रतिक्विंटल बाजार भाव मिळाला. अमरावती मार्केटमध्ये आवक झालेल्या कांद्याला सर्वाधिक 2800 रुपये बाजारभाव मिळाला. मंगळवारी मिळालेले सर्वाधिक दर आज स्थिर असल्याचे दिसून आले.
advertisement
सोयाबीनच्या दरात सुधारणा
आज राज्यातील कृषी मार्केटमध्ये एकूण 29 हजार 690 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. आज सोयाबीनची 5 हजार 615 क्विंटल सर्वाधिक आवक वाशिम मार्केटमध्ये झाली. त्याठिकाणी सोयाबीनला कमीत कमी 4225 ते जास्तीत जास्त 5125 रुपये प्रतिक्विंटल बाजारभाव मिळाला. पिवळ्या सोयाबीनला 6150 रुपये सर्वाधिक बाजार भाव वाशिम मार्केटमध्ये मिळाला. मंगळवारी मिळालेल्या सर्वाधिक दरात आज वाढ झालेली दिसून येत आहे.
advertisement
तुरीच्या दरात वाढ
आज राज्यातील कृषी मार्केटमध्ये एकूण 16 हजार 008 क्विंटल तुरीची आवक झाली. यापैकी जालना मार्केटमध्ये 5 हजार 744 क्विंटल पांढऱ्या तुरीची सर्वाधिक आवक नोंदवण्यात आली. त्याठिकाणी तुरीला 5400 ते 7500 रुपये प्रतिक्विंटल बाजारभाव मिळाला. तसेच जालना मार्केटमध्ये आलेल्या काळ्या तुरीला 8500 रुपये प्रतिक्विंटल असा सर्वाधिक बाजार भाव मिळाला. मंगळवारी मिळालेल्या दराच्या तुलनेत आज तुरीच्या सर्वाधिक दरात वाढ झाली आहे.
view comments
मराठी बातम्या/कृषी/
कांद्याचे दर स्थिर, सोयाबीन आणि कापसाला आज काय मिळाला भाव, एका क्लिकवर चेक करा
Next Article
advertisement
What is PADU:  राज ठाकरेंसह विरोधकांनी आक्षेप घेतलेली PADU मशीन आहे तरी काय? बीएमसी निवडणुकीत कधी होणार वापर
राज ठाकरेंसह विरोधकांनी आक्षेप घेतलेली PADU मशीन आहे तरी काय? बीएमसी निवडणुकीत क
  • मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचे मतदान आता काही तास उरले आहेत.

  • निवडणूक आयोगाकडून पाडू (PADU) या यंत्राचा वापर करण्यात येणार आहे.

  • राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयावर सडेतोड टीका केली.

View All
advertisement