सोलापूर शहरातील म्हेत्रे वस्तीमध्ये महिला रिक्षाचालक शोभा घंटे राहायला आहे. घराची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. तर शोभा घंटे यांचे पती एका हॉटेलमध्ये आचारी म्हणून काम करत होते. पतीच्या पगारावर घर कसे चालवायचं? मुलांचे शिक्षण कसं होणार? हा प्रश्न नेहमी पडत होता. पतीच्या खांद्याला खांदा लावून शोभा घंटे यांनी काम करायचा निर्णय घेतला. एका खाजगी ड्रायव्हिंग स्कुल मधून आपलं प्रशिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर एका बँकेतून कर्ज घेऊन त्यांनी रिक्षा खरेदी केले आणि आपलं काम जोमानं सुरू केलं. दोन वर्षांपूर्वी शोभा घंटे यांच्या पतीचे निधन झाले.
advertisement
सांगलीतील अनोखी परंपरा, पत्रावळीमध्ये बसवले जातात घट, Video
हलाकीच्या परिस्थितीचा सामना करत आपल्या मुलाला मोठ्या अधिकारी पदावर पोहोचवण्यासाठी रिक्षाचा स्टेरिंग कायमस्वरूपी हाती घेतलं. महिला रिक्षाचालक शोभा घंटे यांना पोलीस मध्ये भरती व्हायचं होतं. पोलीस भरतीसाठी अनेक वेळा प्रयत्न केला पण उंची कमी असल्याने ते भरती होऊ शकले नाही. तर 2007 साली त्या होमगार्ड मध्ये भरती झाल्या. परंतु रिक्षा चालवण्याचे प्रशिक्षण घेऊन त्यांनी खाकी वर्दी परिधान करून सोलापूरात रिक्षा सेवा देत आहे. प्रवाशांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सुरक्षित पोहोचवण्याचे काम आज शोभा घंटे करत आहे. तर अनेक प्रवासी ड्रायव्हर शोभा यांचा मोबाईल नंबर घेऊन आवडीने त्यांच्या रिक्षातून प्रवास करत आहे.