नेमकी घटना काय?
अभिजीत कुडे असं गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचं नाव आहे. तो वरोरा तालुक्यातील माढेळी गावातील रहिवासी आहे. काही दिवसांपूर्वी त्याने अजित पवार गटात प्रवेश केला होता. आरोपी कुडे हा मागील काही दिवसांपासून याच गावातील एका विवाहित महिलेचं लैंगिक शोषण करत होता. त्याने सुरुवातीला सोशल मीडियावरून तिच्याशी संपर्क साधला. तिला वारंवार मेसेज आणि कॉल करून बाहेर भेटायला बोलावलं. यानंतर त्याने दोन ते तीन वेळा शरीरसंबंध ठेवल्याचं पीडितेनं तक्रारीत म्हटलं आहे.
advertisement
आरोपी एवढ्यावरच थांबला नाही. तर त्याने शरीरसंबंध ठेवतानाचे काही फोटो आणि व्हिडीओ देखील काढले, हेच व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत आरोपी तिला ब्लॅकमेल करत होता. आरोपीच्या सततच्या त्रासाला कंटाळून पीडितेनं तिच्यासोबत घडलेला प्रकार आपल्या पतीला सांगितला. यानंतर दोघंही वरोरा पोलीस ठाण्यात हजर झाले. त्याने आरोपी अभिजीत कुडे याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पण गुन्हा दाखल होताच आरोपी पोलीस ठाण्यातून पसार झाला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
"...नाहीतर तो माझ्यावर सतत अत्याचार करेन"
या सगळ्या प्रकारावर प्रतिक्रिया देताना पीडितेनं सांगितलं, "माझ्या गावातील एक व्यक्ती आहे. तो मला कॉल मेसेज करायचा. त्याच्याकडे याचं रेकॉर्डिंग आहे. रेकॉर्डिंग आहे की नाही, हे मला माहीत नाही. पण याच अधारे तो मला ब्लॅकमेल करायचा आणि माझ्याशी संबंध ठेवायचा. त्याने दोन ते तीन वेळा माझ्याशी अशाप्रकारे संबंध ठेवलेय त्यामुळे आम्ही पोलीस ठाण्यात आलो आहोत. काल तो पोलीस ठाण्यात आला होता. पण तो तिथून परत फरार झाला. अत्याचाराबद्दल मी माझ्या पतीला सांगितलं, म्हणून त्याने माझ्या पतीवर चुकीचे आरोप लावून गुन्हा दाखल केला आहे. मला न्याय मिळावा नाहीतर तो माझ्यावर सतत अत्याचार करेन."