आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठक घेतली. या बैठकीत मुस्लिम समाजाला जवळ करा. त्यांना राष्ट्रवादी पक्षाची विचारधारा ही फुले शाहू आंबेडकर यांचीच आहे, हे ठासून सांगा, असे दत्तात्रय भरणे म्हणाले.
मुस्लिमांसाठी अजित पवार हाच एकमेव नेता हे समजावून सांगा
मुस्लिम समाजा बद्दल जर कोण बोलले तर त्यांना उत्तर देणारा अजित पवार हा एकमेव नेता आहे, हे लोकांना समजावून सांगा. मुळात राष्ट्रवादी पक्ष फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारावर चालतो, हे मुस्लीम लोकांना सांगताना त्यांच्यापर्यंत पक्षाची ध्येय धोरणे पोहोचवा, अशा सूचना भरणे यांनी केल्या आहेत.
advertisement
सोलापुरात राष्ट्रवादीकडून डॅमेज कंट्रोलचे प्रयत्न
सोलापुरात राष्ट्रवादीचे तीन माजी आमदार भाजपमध्ये प्रवेशाच्या तयारीत असताना राष्ट्रवादीकडून डॅमेज कंट्रोलचे प्रयत्न सुरू झाले आहेत. राज्याचे कृषीमंत्री आणि राष्ट्रवादीचे संपर्क मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत सोलापुरात पदाधिकाऱ्यांची बैठक झाली.
सोलापुरात भाजपचे मिशन लोटसमध्ये राष्ट्रवादीचे तीन माजी आमदार भाजपत जाण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून डॅमेज कंट्रोलसाठी शहर आणि ग्रामीण दोन्ही ठिकाणी बैठक घेतली जात आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा आढावा घेऊन पदाधिकाऱ्यांनी पक्ष सोडू नये, यासाठी पक्षाकडून प्रयत्न सुरू आहेत.