पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे निवडणुकीचा बिगुल वाजला असून, या निवडणुकीत आता दिग्गज उमेदवारांच्या एन्ट्री होऊ लागली आहे. इंदापूरमधून हर्षवर्धन पाटील यांची लेक अंकिता पाटील आणि दत्तात्रय भरणे यांचे चिरंजीव श्रीराज भरणे यंदा जिल्हा परिषदेची निवडणूक लढत आहेत.
पुणे जिल्हा परिषदेच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत राज्याचे माजी सहकार आणि संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या, इंदापूर तालुक्यातील बावडा गटामधून जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या अंकिता पाटील ठाकरे यांनी राष्ट्रवादीच्या वतीने अर्ज दाखल केला. त्यांचे बंधू राजवर्धन हर्षवर्धन पाटील आणि चुलते भैयासाहेब पाटील यांनी अंकिता पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला.
advertisement
कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचे चिरंजीव श्रीराज भरणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे अर्ज दाखल केला. बोरी पंचायत समिती गणामधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने त्यांनी अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल केला. भरणे यांच्यानंतर सक्रिय राजकारणात येणारी ही त्यांची दुसरी पिढी आहे.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित आल्या आहेत. मी अंकिता पाटील यांच्या प्रचाराला जाईल, असे दत्ता भरणे यांनी सांगितले. तर मी देखील दत्तात्रय भरणे यांचे चिरंजीव श्रीराज भरणे यांच्या प्रचाराला जाणार असल्याचे हर्षवर्धन पाटील म्हणाले.
