विशाल कुलकर्णी गुरुजी यांनी सांगितलं की, माघी गणेश जयंतीच्या काळात बुध ग्रहाच्या नक्षत्र बदलामुळे मिथुन, सिंह, कर्क, मेष, मकर आणि वृश्चिक या राशींवर सकारात्मक परिणाम दिसून येऊ शकतो. या काळात काही राशींना आर्थिक व्यवहार, नोकरी आणि व्यवसायाशी संबंधित बाबींमध्ये अनुकूलता जाणवू शकते.
मेष - मेष रास गणपती बाप्पाशी संबंधित मानली जाते. त्यामुळे या राशीच्या लोकांना कामाच्या ठिकाणी येणाऱ्या अडचणी काही प्रमाणात कमी होऊ शकतात. नोकरी किंवा व्यवसायाच्या ठिकाणी यश मिळण्याची शक्यता आहे.
advertisement
10 दिवसांनंतर नशीब बदलणार! 'या' राशींसाठी स्पेशल असणार प्रेमाचा महिना, मिळणार गुड न्यूज
वृश्चिक - वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा काळ अनुकूल ठरू शकतो. तुम्ही करत असलेल्या प्रयत्नांना यश मिळण्याची शक्यता आहे. प्रेमसंबंध अधिक दृढ होतील. तसेच नवीन योजना आखून काम केल्यास त्या यशस्वी ठरू शकतात.
मकर - मकर राशीच्या लोकांसाठी हा काळ पैशांचे नियोजन करण्यासाठी चांगला मानला जात आहे. उत्पन्न आणि खर्च यामध्ये संतुलन राखता येण्याची शक्यता आहे. व्यवसायात देखील प्रगती होऊ शकते.
मिथुन आणि कर्क - मिथुन आणि कर्क राशीवर बुध ग्रहाच्या नक्षत्र बदलाचा प्रभाव राहणार आहे. या राशीच्या लोकांमध्ये संवाद आणि संपर्क वाढू शकतो. त्यामुळे काम आणि व्यवसायाच्या संधी मिळण्याची शक्यता आहे.
सिंह - सिंह राशीच्या लोकांनाही बुध ग्रहाच्या बदलांचा फायदा होऊ शकतो. नोकरीत किंवा कामाच्या ठिकाणी त्यांना चांगल्या संधी मिळू शकतात. तसेच प्रसिद्धी मिळण्याची शक्यता आहे; मात्र, या काळात संयम ठेवणे आवश्यक आहे.





