TRENDING:

'ती' आता..लेकीच्या जाण्याने बापाचं काळीज चिरलं, नीलम शिंदेच्या वडिलांच्या एका वाक्याने सातारा हळहळलं

Last Updated:

कराडच्या नीलम शिंदेचा अमेरिकेत हिट अँड रन अपघातानंतर 14 महिन्यांच्या कोमात मृत्यू, आखातातील युद्धामुळे वडिलांना शेवटचे दर्शन न मिळाल्याने कुटुंब शोकाकुल.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
कराड, प्रतिनिधी विशाल पाटील: नीलमचे वडील पायानं अधू बायको गेल्याचं दु:ख अन् आता काळजाचा तुकडा असलेली लेकही हे जग सोडून गेली. बाप एकटा पडला. आखातात सुरू असलेल्या युद्धामुळे लेकीला शेवटचं पाहता आलं नाही. तिच्याशी बोलता आलं नाही .जवळपास दोन महिन्यापूर्वी फोन झाला तो शेवटचाच होता. हे असं काही होईल असं वाटलं नव्हतं. कुठेतरी आशा होती की काहीतरी चमत्कार होईल अन् सुधारणा होईल. हे बोलतानाही नीलम शिंदेच्या वडिलांचे शब्द जड झाले होते. अश्रू ओघळत होते.
'आईपाशी गेलीय ती...' शेवटचं लेकीला डोळेभरून बघताही नाही आलं, नीलम शिंदेच्या वडिलांना अश्रू अनावर
'आईपाशी गेलीय ती...' शेवटचं लेकीला डोळेभरून बघताही नाही आलं, नीलम शिंदेच्या वडिलांना अश्रू अनावर
advertisement

फोन नाही अन् हे असं घडलेलं, काय बोलणार तरी काय? या वयात. परमेश्वर काय करेल ते. तिला सुखी ठेवावं, तिला तिच्या आईपाशी सुखी ठेवावं. आईपाशी गेलीय आपली. नीलमच्या वडिलांचे शब्द हे बोलनाही जड झाले होते. डोळ्यातून अश्रू येत होते. हतबल झाले होते. पत्नी आणि मुलगी दोघीही गेल्याचं दु:ख पचवण्याशिवाय आता त्यांच्या हातात काहीच नव्हतं. 12 फेब्रुवारीला तिच्या वडिलांशी शेवटचं बोलणं झालं होतं.

advertisement

नेमकं काय घडलं?

साताऱ्याच्या कराड तालुक्यातील उंब्रज वडगांव इथल्या नीलम तानाजी शिंदे हिचा अमेरिकेत उपचार सुरू असताना 1 वर्ष 27 दिवस मृत्यूशी सुरू असलेली झुंज थांबली. अमेरिकेत गेल्या वर्षी नीलमचा हिट अँड रनमध्ये अपघात झाला होता, तेव्हापासून ती कोमात असून मृत्यूची झुंज देत होती. आखाती देशातील युध्दामुळे तिच्या कुटुंबियांना अमेरिकेत जाता आले नाही. निलमवर तिच्या आत्याने भारतीय पध्दतीने अंत्यसंस्कार केले. यावेळी भारतात असलेल्या कुटुंबियांनी व्हिडीओ कॉलद्वारे अंत्यविधी पाहिला.

advertisement

नीलमच्या मामांची प्रतिक्रिया

आखाती देशातील युद्धामुळे नीलमच्या वडिलांना लेकीला पाहण्यासाठी जाताही आलं नाही. तिकीट मिळवण्यासाठी धडपड केली मात्र तिकीट उपलब्ध होत नव्हतं. अतिशय दु:खद घटना घडली आहे. गेले 14 महिने ती मृत्युशी झुंज देत होते. तिथल्या प्रशासनाने भरपूर मदत केली. तिचे उपचारही चांगल्या ठिकाणी सुरू होते. तिच्या दोन्ही पायाला आणि हाताला इंज्युरी झाली ते सगळं क्लीअर झालं. मात्र मेंदूची रिकव्हरी होऊ शकली नाही. डोळे उघडायची समोर बघायची पण प्रत्यक्षात तिला काही समजत नव्हतं. ती कोणाला ओळखत नव्हती. आम्हाला कुठेतरी एक आशा होती. एवढे दिवस गेले काहीतरी कुठेतरी रिकव्हरी होईल. मात्र दुर्देवानं 28 मार्च रोजी फोन आला. आठवड्यातून एकदा फोन यायचा. तिथून तिच्या प्रकृतीची सविस्तर माहिती सांगितली जायची.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
Youtube वर पाहिलं अन् निर्णय घेतला, नोकरी करत सुरू केला थंडगार पेयाचा व्यवसाय, आता डबल कमाई
सर्व पहा

नीलमची आत्या तिथे वास्तव्यास आहे. तिच्याकडे ग्रीन कार्ड आहे. ज्यावेळी अपघात झाला तेव्हा तिचे वडील आणि भाऊ गेले होते. तिथली कायदेशीर प्रोसेस करून ते दोन महिन्यानंतर पुन्हा परत आले. तिच्यात सुधारणा होईल अशी आशा होती. मात्र 26 मार्च रोजी तिच्या फुफ्फुसात इन्फेक्शन झाल्याचं सांगितलं. तिचा लढा आतापर्यंत लढला. ती हुशार होती, तिने पहिला नंबर सोडला नाही. नासामध्ये अप्रांटिसशीप केली. दुर्दैवानं ती घटना घडली. त्यावेळी कुटुंबियांनी डोळे दान करण्याचा निर्णय घेतला. तिच्या डोळ्यांच्या रुपात नीलम जिवंत राहील असं आम्हाला वाटलं असं नीलमच्या मामांनी सांगितलं.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
'ती' आता..लेकीच्या जाण्याने बापाचं काळीज चिरलं, नीलम शिंदेच्या वडिलांच्या एका वाक्याने सातारा हळहळलं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल