रत्नागिरी, 15 ऑगस्ट : रत्नागिरी जिल्ह्यातील खळबळ उडालेल्या नीलिमा चव्हाण मृत्यू प्रकरणाचा प्रतिक्षेत असलेला शव विच्छेदनाचा अहवाल पोलिसांच्या हाती आला आहे. या अहवालानुसार तिचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे , तिने दबावाखाली आत्महत्या केल्याचा संशय असून त्या दृष्टीने पोलीस तपास करत आहेत. दापोली येथील एका बँकेत कामाला असणारी नीलिमा चव्हाण 29 जुलै रोजी आपल्या चिपळूण ओंबली गावी निघाली होती. ती खेड येथून बेपत्ता झाली होती, मात्र एक ऑगस्ट रोजी तिचा मृतदेह दाभोळ खाडीत आढळल्या नंतर तिच्या मृत्यूबाबत उलट सुलट चर्चा सुरू झाली होती.
advertisement
निलिमाच्या डोक्यावरचे केस गेल्याने तिच्या नातेवाईकांनी घातपात असल्याचा आरोप केला होता, त्यामुळे पोलिसांनी त्या दृष्टीने तपास सुरू केला. पोलिसांनी या प्रकरणी 104 साक्षीदार तपासले होते दरम्यान तिच्या शरिरावर कुठेही जखमा आढळल्या नव्हत्या, तसेच विष अहवालात शरिरात कोणतेही विषारी द्रव्य नसल्याचे स्पष्ट झाले होते, त्यामुळे तिच्या शव विच्छेदन अहवालाची प्रतीक्षा होती. आता हा अहवाल प्राप्त झाला आहे. हा अहवाल दापोली उपजिल्हा रुग्णालयात आला असून त्यात तिचा मृत्यू बुडून झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
नाभिक समाज मात्र नीलिमा चव्हाणचा मृत्यू घातपात असल्याच्या संशयावर ठाम आहे. 22 ऑगस्ट रोजी चिपळूण येथे नाभिक समाजाच्या वतीने आक्रोशी जन आंदोलन करण्याच्या तयारीत आहे. पण आता निलिमाचा शिवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्याने समाज नेमकी काय भूमिका घेणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
नीलिमा चव्हाण ही एका मोठ्या राष्ट्रीयकृत बँकेच्या दापोली शाखेत कंत्राटी पद्धतीने काम करत होती. त्याच बँकेतील एक कर्मचारी तिच्यावर वारंवार कामासाठी दबाव टाकत होता, अशी माहिती तिच्या नातेवाईकांनी जिल्हा पोलीस प्रशासनाकडे दिली. नीलिमा शेवटचे दांपत्याला भेटल्यानंतर एक मुलगी तिच्या हाताला धरून बसमध्ये चढत असल्याचा व्हिडिओ समोर आला. तसेच नीलिमा चव्हाण ही एका तरुणाला शेवटचं भेटली होती अशी ही माहिती समोर आली. काही दिवसापूर्वी निलीमाने एका तिच्या मित्राला मी जीवनाला कंटाळले आहे असा मेसेज केला असल्याचे पोलीस तपासात समोर आलं.