TRENDING:

अजितदादांच्या ड्रीम प्रकल्पाची मुख्यमंत्री फडणवीसांनी केली घोषणा, पण निधी कुठेय? सुप्रिया सुळेंचा सवाल

Last Updated:

बारामती तालुक्यातील कण्हेरी याठिकाणी झालेल्या जाहीर सभेत अजित पवार यांनी या योजनेचा उल्लेख केला होता. आपण या योजनेसाठी १ हजार कोटी रुपयांची तरतूद करत असून

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे : महायुती सरकारने आपला दुसरा अर्थसंकल्प सादर केला आहे. राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आणि माजी अर्थमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा अर्थसंकल्प सादर केला. अजितदादांच्या स्मृतीला उजाळा देत   अर्थसंकल्पात नीरा-कऱ्हा उपसा सिंचन प्रकल्पाची घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली. पण 'या योजनेसाठी निधीची तरतूद मात्र केली नाही. अर्थसंकल्पात तशी तरतूदच दिसत नाही, असं सांगत ही केवळ घोषणाच असल्याचं सिद्ध होत आहे, असा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. हा प्रकल्प नेमका कधी आणि कसा पूर्ण करणार? असा सवालही त्यांनी उपस्थितीत केला.
News18
News18
advertisement

मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. त्यातील नीरा-कऱ्हा उपसा सिंचन प्रकल्पाबाबत त्यांनी केलेल्या घोषणेचा उल्लेख करत खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट करून सरकारच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. "ही निव्वळ घोषणा ठरू नये, ठोस निधीची तरतूद करून लवकरात लवकर काम सुरू होण्याच्या दृष्टीने आखणी करण्यात यावी, म्हणजे बारामती आणि पुरंदर तालुक्यातील अवर्षणग्रस्त नागरिकांत संभ्रम राहणार नाही", अशी मागणी सुळे यांनी केली.

advertisement

हे अजितदादांचं स्वप्न होतं

बारामती आणि पुरंदर तालुक्यातील अवर्षणग्रस्त गावांतल्या शेतजमीनी ओलिताखाली आणणे तसंच पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देण्यासाठी नीरा आणि कऱ्हा नदीच्या पाण्याची महत्वाकांक्षी उपसा सिंचन योजना हे स्व.अजितदादा पवार यांचे स्वप्न होतं. या योजनेच्या माध्यमातून या भागातील गावांवरील जिरायती भाग हा शिक्का कायमस्वरुपी पुसून टाकणे ला जाणे शक्य आहे. त्यासाठी अजित पवार प्रयत्नशील होते, असंही सुळे यांनी म्हटलं आहे.

advertisement

घोषणा केली पण निधीचं काय? 

अवघ्या दीड महिन्यांपूर्वी २४ जानेवारी २०२६ रोजी बारामती तालुक्यातील कण्हेरी याठिकाणी झालेल्या जाहीर सभेत अजित पवार यांनी या योजनेचा उल्लेख केला होता. आपण या योजनेसाठी १ हजार कोटी रुपयांची तरतूद करत असून त्या माध्यमातून सुमारे अडीच टीएमसी पाणी साठविण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले होतं. दुर्दैवाने आज आपल्यात अजित पवार नाहीत. त्यांच्या जागी अर्थमंत्री या नात्याने फडणवीस यांनी अर्थसंकल्प सादर केला. त्यात त्यांनी विविध प्रकल्पांची घोषणा केली. अगदी नीरा-कऱ्हा उपसा सिंचन प्रकल्पाचा सुद्धा त्यांनी उल्लेख केला मात्र त्यासाठीच्या निधीच्या तरतुदींचा उल्लेख मात्र केला नाही, ही बाब खासदार सुप्रिया सुळे यांनी लक्षात आणून दिली.

advertisement

राज्यातील इतर सिंचन प्रकल्पांच्या घोषणा मुख्यमंत्र्यांनी निधीसहीत केल्या आहेत. यात बारामती आणि पुरंदर तालुक्यासाठी अतिशय महत्त्वाच्या असलेल्या नीरा-कऱ्हा उपसा सिंचन प्रकल्पाबाबत मात्र त्यांनी निव्वळ घोषणाच केल्याचं दिसतंय. त्यामुळे शासनाची या प्रकल्पाबाबत नेमकी काय भूमिका आहे, याबाबत जनतेमध्ये संभ्रम निर्माण झाला असल्याचे त्यांनी म्हटलं आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतकऱ्यांसाठी चिंताजनक बातमी, कांदा दरात वाढ नाहीच, केळीला काय मिळाला भाव?
सर्व पहा

हा प्रकल्प या भागातील शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्वाचा असून या माध्यमातून येथील जमीन ओलिताखाली येणार आहे. तसंच पिण्याचे पाणी देखील उपलब्ध होणार आहे. या भागातील नागरीकांची होणारी सोय आणि शेतकऱ्यांचे हित लक्षात घेता हा प्रकल्प लवकरात लवकर पुर्ण करण्यासाठी शासनाने भरीव तरतूद करावी, अशी मागणी सुद्धा सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केलीये.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
अजितदादांच्या ड्रीम प्रकल्पाची मुख्यमंत्री फडणवीसांनी केली घोषणा, पण निधी कुठेय? सुप्रिया सुळेंचा सवाल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल