रायगड जिल्ह्यातील खोपोली शहर हत्येच्या घटनेनं हादरलंय. खोपोलीत शिंदेंच्या शिवसेनेच्या नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखेंची हत्या करण्यात आली आहेय मंगेश काळोखे सकाळी आपल्या मुलीला शाळेत सोडायला गेले होते. मुलीला शाळेत सोडून परतत असताना काळ्या रंगाच्या कारमधून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला केल्याची माहिती मिळतेय. या हल्ल्यात मंगेश काळोखे यांचा मृत्यू झालाय. या हत्येच्या घटनेनंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी आणि काळोखेंच्य नातेवाईकांनी खोपोली पोलीस स्टेशनला घेराव घातला.
advertisement
मंगेश काळोखेच्या आतेभावाने काय आरोप केला?
मंगेश काळोखे याचे मामेभाऊ म्हणले, खोपोलीचे पोलिस निरीक्षक सचिन हिरे आणि आरोपी यांची सांगड आहे. आम्हांला धोका आहे, अशी कल्पना माझा आतेभाऊ मंगेश काळोखे आणि त्याचा पुतण्या यांनी पीआय हिरे यांना दिली होती. मात्र पीआय सचिन हिरे यांना माहिती देऊनही त्यांनी दखल घेतली नाही. सचिन हिरे यांचे वागणे अतिशय संशयास्पद आहे. सचिन हिरे यांचे निलंबन करून चौकशी करण्यात यावी अशी मागणी मंगेश काळोखे यांचे मामे भाऊ यांनी केली आहे.
मंगेश काळोखेंची हत्या राजकीय वादातून झाली?
खोपोली नगरपरिषद निवडणुकीत शिवसेनेच्या मानसी काळोखे या नगरसेवकपदी विजयी झाल्यात.या विजयाला अवघे पाच दिवस झाले नाही तोच त्यांचे पती मंगेश काळोखेंची हत्या करण्यात आल्यानं खळबळ उडालीय. मंगेश काळोखे यांच्या हत्येचं कारण समोर आलेलं नाही. ही हत्या राजकीय वादातून झाली की अन्य कारणानं याचा तपास पोलिसांकडून केला जातोय.
