ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन केलेले तरूणांकडे नोकरीची संधी आहे. एमबीए आणि सीए पदाची डिग्री घेतलेल्या तरूणांसाठी केंद्र सरकारच्या नोकरीची सुवर्णसंधी आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण म्हणजेच (NHAI)मध्ये डेप्युटी मॅनेजर (फायनान्स अँड अकाउंट्स), ज्युनिअर ट्रान्सलेशन ऑफिसर (JTO)सह अनेक पदांसाठी भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी अलीकडेच अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. एकूण 84 पदासाठी ही भरती होणार आहे. 30 ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या भरती प्रक्रियेसाठीचा शेवटचा दिवस 15 डिसेंबर 2025 आहे.
advertisement
एनएचएआयमध्ये नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी अर्जदारांना https://nhai.gov.in/#/ या वेबसाईटवर जाऊन अर्ज भरायचा आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी बातमीमध्ये अर्जाची लिंक आणि जाहिरातीच्या PDF ची देखील लिंक देण्यात आली आहे. सविस्तर माहितीसाठी अर्ज करण्यापूर्वी अर्जदारांनी एकदा तरी जाहिरातीची PDF नजरेखालून घालावी. डेप्युटी मॅनेजर (फायनान्स अँड अकाउंट्स) पदासाठी 9 जागा, लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन असिस्टंट पदासाठी 1 जागा, ज्युनिअर ट्रान्सलेशन ऑफिसर (JTO)1 जागा, अकाउंटंट पदासाठी 42 जागा आणि स्टेनोग्राफर पदासाठी 31 जागांवर भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी पात्र उमेदवारांनी अर्ज करावेत.
डेप्युटी मॅनेजर पदसाठी अर्जदाराकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून एमबीए फायनान्सची पदवी आवश्यक आहे. लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन असिस्टंट पदासाठी लायब्ररी सायन्समध्ये ग्रॅज्युएशन केलेले असावे. ज्युनिअर ट्रान्सलेशन ऑफिसर पदासाठी इंग्रजी आणि हिंदी विषयामध्ये मास्टर केलेले हवे. या दोन्ही विषयांत एमएची पदवी हवी. सोबतच ट्रान्सलेशनचा डिप्लोमा केलेला असावा किंवा ट्रान्सलेशनचा दोन वर्षांचा अनुभव असावा. अकाउंटंट पदासाठी ग्रॅज्युएशनसोबत चार्टर्ड अकाउंटंट पदवी प्राप्त केलेली असावी. तर, स्टेनोग्राफर पदासाठी ग्रॅज्युएशनसोबतच लघुलेखन (इंग्रजी किंवा हिंदी) मध्ये प्रति मिनिट 80 शब्दांच्या वेगाने 05 मिनिटे श्रुतलेखन आणि ट्रान्सक्रिप्शन वेळ (फक्त संगणकावर) इंग्रजीसाठी 50 मिनिटे आणि हिंदीसाठी 65 मिनिटे असेल, अशा शैक्षणिक पात्रतेची आवश्यकता आहे.
NHAI Recruitment 2025 PDF File: भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण जाहिरात पीडीएफ फाईल- https://drive.google.com/file/d/1nLZKmj7hq8rzVCrbfF0rBwrkrBls9siG/view
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची अर्ज करण्याची लिंक- https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/1258/95810/Index.html
एनएचएआयमधील नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची वयोमर्यादा किमान 18 आणि कमाल 30 वर्षे इतकी हवी आहे. तर, स्टेनोग्राफर पदासाठीची वयोमर्यादा 28 वर्षापर्यंत आहे. अनुसूचित जाती- जमातीतील उमेदवारांना 5 वर्षांसाठीची वयोमर्यादेत सूट आणि इतर मागास प्रवर्गातील उमेदवारांना 3 वर्षांसाठी वयोमर्यादेत सूट दिली जाणार आहे. अर्ज प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने असून अर्ज शुल्क भरण्याची प्रक्रिया सुद्धा ऑनलाईनच आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्याची शेवटची तारीख आणि अर्ज शुल्क भरण्याची शेवटची तारीख एकच असणार आहे. खुला प्रवर्ग, इतर मागास वर्ग आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बळ असलेल्या उमेदवारांना 500 रूपये अर्ज शुल्क असणार आहे. तर, अनुसूचित जाती- जमाती आणि अपंग व्यक्ती असलेल्या उमेदवारांना अर्ज शुल्क नाहीत. त्यांना अर्ज शुल्क माफ करण्यात आले.
