राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, तसेच कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनाही आनंद होईल, असे अहिल्यानगरचे खासदार नीलेश लंके यांनी स्पष्ट केले आहे.
उमेदवार पात्र असल्यामुळेच त्यांना संधी असेल ना...!
पिंपरी-चिंचवड आणि पुण्याचा विकास शरद पवारांनी केला असून अजित पवारांनीही त्याच पावलावर पाऊल ठेवून काम केल्याचं लंके म्हणाले. तसेच पुण्यात अजित पवार गटाने गुन्हेगारांना दिलेल्या उमेदवारीवरून बोलताना, उमेदवार पात्र असल्यामुळेच त्यांना संधी देण्यात आली असेल, असे म्हणत अजित पवार यांच्या गुंडांना उमेदवारी देण्याचे नीलेश लंके यांनी आश्चर्यकारकरित्या समर्थन केले.
advertisement
भाजप राष्ट्रवादीत निकराची लढाई
भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांसाठी ज्या ठिकाणी आपली प्रतिष्ठा पणाला लावलीय त्या पिंपरी चिंचवडमध्ये आजपासून उमेदवारांनी महापालिका निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात केलीय. राष्ट्रवादीतील उमेदवारांच्या प्रचारासाठी खासदार निलेश लंके आज दिवसभर मतदारांना साद घालताना दिसले. तर इकडे भाजपचे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे हे देखील उमेदवार असल्याने निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे , इतर उमेदवारांसह स्वतःचा प्रचार करताना त्यांची दमछाक होताना दिसतेय. मात्र , विकासाच्या मुद्द्यावर जनता आपल्याला कौल देईल आणि पुन्हा एकदा भाजपची सत्ता येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त करत अनेक केंद्रीय आणि राज्यातील भाजपचे बडे नेते शहरात सभा घेणार असल्याची माहिती काटे यांनी दिलीय.
