TRENDING:

अशोक खरातकडून हिंदू स्त्रियांवर अत्याचार, तरी तुम्ही गप्प का? नितेश राणेंनी अखेर मौन सोडलं

Last Updated:

नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणावर नितेश राणे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
गोविंद वाकडे, पिंपरी चिंचवड, प्रतिनिधी : हिंदुत्वाचे पोस्टरबॉय मंत्री नितेश राणे एरवी महिला अत्याचाराच्या प्रकरणावर तावातावाने बोलत असतात. परंतु नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणावर त्यांनी ब्र अक्षरही काढलेले नाही, अशी टीका त्यांच्यावर विरोधकांनी केली. शेकडो हिंदू महिलांचे शोषण होत असताना तुम्ही गप्प का? चार दिवसांपासून तुम्ही एकही शब्द का बोललेला नाहीत? हाच प्रश्न नितेश राणे यांना विचारला असता, त्यांनी सपशेल राजकीय उत्तर दिले.
नितेश राणे-अशोक खरात
नितेश राणे-अशोक खरात
advertisement

नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणावर नितेश राणे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. या प्रकरणातील पीडित महिलांनी थेट सरकारशी संपर्क साधावा, त्यांना सर्वतोपरी मदत केली जाईल, असे आवाहन नितेश राणे यांनी केले आहे. ते पिंपरी चिंचवड येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

प्रत्येक धर्मात अशोक खरातसारखे काही 'सडके आंबे' निघतातच

अशोक खरात याच्या संदर्भाने पत्रकारांनी अडचणीत आणणारे प्रश्न विचारताच, प्रत्येक धर्मात अशोक खरातसारखे काही 'सडके आंबे'निघतातच, असे म्हणून त्यांनी वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. सरकार महिलांच्या बाजूने ठामपणे उभे आहे, असे ते म्हणाले तसेच, या भोंदू बाबाचे सर्वपक्षीय नेत्यांशी संबंध असल्याच्या प्रश्नावर त्यांनी पत्रकारांनाच प्रतिप्रश्न करत अधिक बोलणे टाळले.

advertisement

हिंदू धर्माची बदनामी होत असताना काही जणांना त्यातच आनंद मिळतो

विरोधकांवर टीका करताना त्यांनी म्हटले की, हिंदू धर्माची बदनामी होत असताना काही जणांना त्यातच आनंद मिळतो. याशिवाय छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य करणाऱ्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.

तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वात एसआयटीकडून चौकशी

भोंदूबाबा अशोक खरात याला बुधवारी रात्री नाशिक पोलिसांनी अटक केली. खरातच्या पेन ड्राइव्हमध्ये ५८ आक्षेपार्ह व्हिडिओ सापडल्याने राज्यात एकच खळबळ उडाली आहे. त्याने किती महिलांवर अत्याचार केले आहेत, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. या प्रकरणाची दखल खुद्द मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेऊन पोलीस महासंचालकांना कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यांच्या निर्देशानुसारच खरात याच्या चौकशी करिता तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वात एसआयटीची स्थापना केल्याचे सांगितले जाते.

advertisement

तेजस्वी सातपुते यांच्याकडून 'कॅप्टन'ची दोन तास चौकशी

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
पुणेकर इंजिनिअरची कमाल, कचऱ्यातून बंपर कमाई, ‘त्या’ वस्तूंना अमेरिका ते दुबई जगभरात डिमांड! Video
सर्व पहा

एसआयटीच्या प्रमुख तेजस्विनी सातपुते यांनी महिलांच्या लैंगिक शोषणाप्रकरणी अशोक खरात याची काल तब्बल सात तास चौकशी केली तर आजही दुपारपासून त्याची चौकशी सुरू आहे. त्याच्याकडे असलेल्या पॅनड्राईव्हबाबतही त्यांनी विचारपूस केल्याचे कळते.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
अशोक खरातकडून हिंदू स्त्रियांवर अत्याचार, तरी तुम्ही गप्प का? नितेश राणेंनी अखेर मौन सोडलं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल