या नवीन फास्टॅग-आधारित वार्षिक टोल पास योजनेअंतर्गत, 3000 रुपयांच्या पासमध्ये तुम्हाला वर्षभर टोल टॅक्स देण्याची आवश्यकता राहणार नाही. हा पास फक्त राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि राष्ट्रीय एक्सप्रेस वेवर चालणार आहेत. या अंतर्गत येणाऱ्या टोल प्लाझावर पास व्हॅलिड असेल. थर्ड पार्टी कॉन्ट्रॅक्ट अथवा राज्याच्या अंतर्गत येणाऱ्या महामार्गासाठी हा पासू लागू होणार नाही. त्यामुळे हा पास काढण्याआधी त्याची माहिती असणं आवश्यक आहे.
advertisement
3000 रुपयांचा Fastag पास कधी मिळणार? केंद्रीय मंत्री गडकरींनी तारीखच सांगितली
समृद्धी महामार्ग, अटल सेतू आणि मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर देखील हा टोलपास चालणार नाही. मग महाराष्ट्रात नेमकं कुठे कुठे हा टोलपास चालणार? असा प्रश्न आता तुम्हाला पडला असेल तर त्याच प्रश्नाचं उत्तर समजून घेऊया. महाराष्ट्रात 87 टोलप्लाझा आहेत. NHAIच्या टोल इन्फॉर्मेशन सिस्टिमच्या रेकॉर्डनुसार, काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत देशभरात एकूण 1057 NHAI टोल आहेत. एकट्या आंध्र प्रदेशात सुमारे 78 टोल आहेत, तर बिहारमध्ये राष्ट्रीय महामार्गावर 33 टोल आणि उत्तर प्रदेशात 123 टोल प्लाझा आहेत.
महाराष्ट्रात त्यापैकी फक्त 20 नॅशनल हायवे आहेत. नॅशनल एक्सप्रेस वे एकही नाही. त्यामुळे फक्त या 20 नॅशनल हायवेसाठी पास काढण्यात काहीच अर्थ नाही. याचं आणखी एक कारण म्हणजे हा पास केवळ खासगी कारसाठी असणार आहे. कर्मशियल कार, गाड्यांसाठी हा पास असणार नाही. त्यामुळे त्याचा थेट फायदाही होणार नाही. 20 नॅशनल हायवेवरुन रोज ये जा तर करणं होणार नाही त्यामुळे इतके पैसे भरुन हा पास घेणं व्हॅलिड ठरत नाही.
महाराष्ट्रात कोणते नॅशनल हायवे येतात ते जाणून घेऊया.
maharashtra toll(1)-2025-06-db5e1656626021ec17ef52499f6b1854
मोठी बातमी! 3000 रुपयांचा पास काढा आणि वर्षभर टोल न भरता फिरा, सरकारची मोठी घोषणा
देशात कोणत्या राज्यात किती टोल आहेत, याची माहिती तुम्ही तुमचा प्रवास सुरू करण्यापूर्वीच तपासू शकता. टोल प्लाझा इंफोर्मेशन सिस्टिमच्या साइटवर जाऊन देखील याची माहिती घेऊ शकता. यासाठी तुम्हाला NHAI च्या अधिकृत पोर्टल tis.nhai.gov.in वर जावे लागेल. होम पेजवर Toll Plazas या बटणावर क्लिक करा. येथे तुम्हाला At a Glance वर क्लिक करायचं आहे. यानंतर तुमच्यासमोर सर्व टोल प्लाझाची यादी दिसेल.