नेमकी मागणी काय?
नितीन उबाळे हा तरुण गेल्या अनेक दिवसांपासून कौटुंबीक समस्येमुळे त्रस्त आहे. त्याची पत्नी त्याच्यासोबत राहत नसून ती नांदायला तयार नसल्याचे त्याचे म्हणणे आहे. आपला संसार पुन्हा सुरळीत व्हावा, यासाठी तो वारंवार प्रशासनाकडे आणि पोलिसांकडे साकडे घालत आहे. मात्र, मागणी मान्य होत नसल्याने त्याने थेट जिल्हाधिकारी कार्यालयाची इमारत गाठली आणि टोकाचा निर्णय घेतला.
advertisement
धक्कादायक बाब म्हणजे नितीनने आत्महत्येचा प्रयत्न करण्याची ही पहिली वेळ नाही. पत्नी नांदत नसल्याच्या कारणावरून यापूर्वी त्याने पाच वेळा वेगवेगळ्या ठिकाणी आणि वेगवेगळ्या पद्धतीने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. पण प्रत्येक वेळी पोलिसांनी वेळीच मध्यस्थी करून त्याला वाचवले होते. मात्र, आज प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून त्याने सहाव्यांदा अशाप्रकारे टोकाचं पाऊल उचलण्याचा प्रयत्न केला.
"तुला न्याय मिळवून देऊ, तुझ्या पत्नीशी चर्चा करू, पण तू खाली उतर," अशी विनवणी पोलिसांकडून केली जात आहे. मात्र, नितीन आपल्या मागणीवर ठाम असल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेने बीडमध्ये चर्चेला उधाण आलं आहे.
