नवरात्र दिवस दुसरा: देवी ब्रह्मचारिणीची पूजा कशी करावी? दुसरी माळ कोणती?
उत्तर मध्य रेल्वेमध्ये मेगा भरती सुरू आहे. तब्बल 30 हजारांपेक्षा जास्त पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेची अधिसूचनादेखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. नोकरीच्या शोधात असणार्यांनी अजिबातच वेळ वाया न घालवता, भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावेत. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त ऑनलाइन पद्धतीनेच अर्ज करावा लागणार आहे. 18 सप्टेंबरपासून ऑनलाइन पद्धतीने सुरू झालेल्या भरती प्रक्रियेचा 17 ऑक्टोबर रोजी ऑनलाइन अर्ज करण्याचा शेवटची तारीख आहे. 1763 पदांसाठी अप्रेंटिसशिपसाठी मुलांची भरती केली जाणार आहे.
advertisement
घरातील ओलावा होईल कमी, या उपायांनी दुरुस्त करा फुगलेले खिडक्या-दरवाजे
अप्रेंटिसशिपसाठी 10 वी उत्तीर्ण आणि काही संबंधित ITI ट्रेडमध्ये उत्तीर्ण हवे, अशी शैक्षणिक पात्रतेची गरज आहे. फिटर, वेल्डर, मशिन ऑप्रेटर, कार पेंटर, टेक्निशियन, इलेक्ट्रिशियन, सुतार कामगार, पेंटर, मॅकेनिक, वायरमन, आयटीमध्ये टेक्नोलॉजी सिस्टिमची देखभाल करणे सह अशा अनेक वेगवेगळ्या ITI ट्रेडमध्ये पदवी आहे. 15 ते 24 या वयोगटातील मुलं अर्ज करू शकतात. अनुसूचित जाती- अनुसूचित जमातीतील अर्जदारांना वयामध्ये 5 वर्षांची सूट देण्यात आली आहे. तर, इतर मागासवर्गीय वर्गातील अर्जदारांना वयामध्ये 3 वर्षांची सूट देण्यात आली आहे. जाहिरातीमध्ये नोकरीच्या ठिकाणाबद्दल नमूद करण्यात आले नाही.
देशी गायीच्या तुपाचा असाही वापर... या कंपनीनं केली ब्यूटी प्रॉडक्ट्सची निर्मिती
खुल्या प्रवर्गातील अर्जदारांना आणि इतर मागासवर्गातील अर्जदारांना अर्ज शुल्क 100 रूपये इतके भरावे लागणार आहेत. तर, अनुसूचित जाती- जमातीतील उमेदवारांना आणि महिलांना अर्ज शुल्क नसणार आहे. त्यांना अर्ज शुल्क माफ करण्यात आले आहे.