Window & Door Dampness : घरातील ओलावा होईल कमी, या उपायांनी दुरुस्त करा फुगलेले खिडक्या-दरवाजे

Last Updated:

How To Get Rid Of Window & Door Dampness : ओलाव्यामुळे बऱ्याचदा खिडक्या आणि दरवाजे फुगतात. यामुळे दार बंद करणे तर अवघड होतेच. पण त्याचबरोबर बऱ्याचदा या ओलाव्यामुळे घरात आजार पसरण्याचीही शक्यता असते.

दाराचा ओलावा दूर करण्यासाठी टिप्स
दाराचा ओलावा दूर करण्यासाठी टिप्स
मुंबई : पावसाळ्यात सततची चिकचिक आणि आणि पावसामुळे घराबाहेर पडणं जसं कठीण होतं, तसंच काहीवेळा घरात बसणंही कठीण होऊ शकतं. या परिस्थितीला कारणीभूत असतो ओलावा. ओलाव्यामुळे बऱ्याचदा खिडक्या आणि दरवाजे फुगतात. यामुळे दार बंद करणे तर अवघड होतेच. पण त्याचबरोबर बऱ्याचदा या ओलाव्यामुळे घरात आजार पसरण्याचीही शक्यता असते.
मात्र तुम्हाला आता काळजी करण्याची गरज नाही. कारण आम्ही तुम्हाला तुमच्या खिडक्या आणि दरवाजे सहजपणे दुरुस्त करण्याचे दोन सोपे मार्ग सांगत आहोत. यामुळे तुमचे दरवाजे एकदम मोकळे होतील, त्यांचे फुगलेले भाग दुरुस्त होऊ लागतील आणि तुम्ही कायम सुरक्षित राहाल.
मोहरीचे तेल आणि लिंबाचा रस
प्रथम मोहरीचे तेल आणि लिंबाचा रस एका भांड्यात समान प्रमाणात घेऊन एकत्र करा. त्यानंतर ओलाव्यामुळे दारे आणि खिडक्या फुगलेल्या ठिकाणी हे मिश्रण लावा. लावल्यानंतर ते काही वेळ उघडे ठेवा. यानंतर दरवाजे आणि खिडक्या सहजपणे उघडतील आणि बंद होतील.
advertisement
मेणबत्ती किंवा व्हॅसलीन
पावसाळ्यानंतर तुमचे दरवाजे किंवा खिडक्या फुगले असतील तर तुम्ही ते मेणबत्ती किंवा व्हॅसलीनने दुरुस्त करू शकता. यासाठी आधी सॅंडपेपरने दरवाजे आणि खिडक्या घासून काढा. नंतर मेणबत्ती किंवा व्हॅसलीन त्यावर लावा.
घरगुती उपायांचे फायदे
या घरगुती उपचारांचा वापर करून तुम्ही पावसाच्या पाण्यामुळे फुगलेल्या खिडक्या आणि दरवाजे स्वतःच दुरुस्त करू शकता. या पद्धती तुम्हाला तुमच्या घराच्या खिडक्या आणि दरवाजे, सहज आणि स्वस्त दरात दुरुस्त करताब्येतील. मोहरीचे तेल आणि लिंबाचा रस किंवा मेणबत्ती आणि व्हॅसलीन वापरणे, पावसाच्या पाण्याच्या गळतीमुळे फुगलेल्या दरवाजे आणि खिडक्या दुरुस्त करण्याचा एक सोपा मार्ग आहे.
advertisement
अस्वीकरण : या बातमीत दिलेली माहिती आणि आरोग्याशी संबंधित सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून, डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच काहीही वापरा. त्याच्या वापरामुळे होणाऱ्या कोणत्याही नुकसानासाठी लोकल-18 जबाबदार राहणार नाही.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Window & Door Dampness : घरातील ओलावा होईल कमी, या उपायांनी दुरुस्त करा फुगलेले खिडक्या-दरवाजे
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement