नवरात्र दिवस दुसरा: देवी ब्रह्मचारिणीची पूजा कशी करावी? दुसरी माळ कोणती? संपूर्ण पूजा विधी
- Published by:Chetan Bodke
- local18
- Reported by:Namita Suryavanshi
Last Updated:
Navratri 2nd Day : 23 सप्टेंबर रोजी नवरात्राची दुसरी माळ असून ही माळ दुर्गेच्या द्वितीय स्वरूप ब्रह्मचारिणी देवीला समर्पित आहे. ब्रह्मचारिणी देवीची दुसरी माळ तसेच देवीला नैवेद्य आणि देवीची पूजा कशी करावी याबद्दल गुरुजी आदित्य जोशी यांनी सांगितले आहे.
मुंबई: चातुर्मासातील आश्विन महिन्याच्या शुद्ध पक्षात साजरा होणारा शारदीय नवरात्रोत्सव यंदा 22 सप्टेंबरपासून सुरू झाला आहे. प्रतिपदा ते नवमी अशा नऊ दिवसांत आदिमायेच्या नऊ स्वरूपांची भक्तिभावाने पूजा केली जाते. सोमवारपासून नवरात्र सुरू झाल्यानंतर मंगळवारी, 23 सप्टेंबर रोजी नवरात्राची दुसरी माळ असून ही माळ दुर्गेच्या द्वितीय स्वरूप ब्रह्मचारिणी देवीला समर्पित आहे. ब्रह्मचारिणी देवीची दुसरी माळ तसेच देवीला नैवेद्य आणि देवीची पूजा कशी करावी याबद्दल आदित्य जोशी गुरुजी, मुंबई यांनी लोकल 18 सोबत संवाद साधताना सांगितलं आहे.
ब्रह्मचारिणी देवीचे महत्व
कठोर तपाचे आचरण करणारी देवी म्हणून ब्रह्मचारिणी ओळखली जाते. तिच्या उजव्या हातात जपमाळ आणि डाव्या हातात कमंडलू आहे. हजारो वर्षांच्या कठोर तपामुळे दुर्गेच्या या स्वरूपाला ब्रह्मचारिणी असे नाव मिळाले. देवीच्या या तपश्चर्येमुळे महादेव प्रसन्न झाले.
advertisement
ब्रह्मचारिणी देवीच्या पूजनाने भक्ताला भक्ती, सिद्धी, ज्ञान, वैराग्य, संयम, त्याग आणि धैर्य प्राप्त होते, असे शास्त्रात म्हटले आहे
पूजन- नैवेद्य
सूर्योदयापूर्वी उठून नित्यकर्म आटोपल्यानंतर ब्रह्मचारिणी देवीचे षोडशोपचार पूजन करावे. या दिवशी देवीला दूध अथवा दुधापासून तयार केलेल्या मिठाईचा नैवेद्य दाखवणे शुभ मानले जाते. तसेच देवीची दुसरी माळ दुर्वा किंवा झेंडूच्या फुलांची माळ अर्पण करावी. केळीचा नैवेद्यही या दिवशी विशेष मानला जातो.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 22, 2025 4:40 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
नवरात्र दिवस दुसरा: देवी ब्रह्मचारिणीची पूजा कशी करावी? दुसरी माळ कोणती? संपूर्ण पूजा विधी