देशी गायीच्या तुपाचा असाही वापर... या कंपनीनं केली ब्यूटी प्रॉडक्ट्सची निर्मिती
- Published by:Chetan Bodke
- local18
- Reported by:Bhavna Arvind Kamble
Last Updated:
माधव सृष्टी या कंपनीने देशी गायींच्या तूपावर आधारित एक विशेष उत्पादने सादर केली आहेत. या कंपनीचा मुख्य उद्देश म्हणजे देशी गायींच्या सवर्धन आणि प्रजननास प्रोत्साहन देणे तसेच त्याच्या नैतिक आणि शाश्वत वापरातून उच्च गुणवत्ता असलेली उत्पादने निर्माण करणे.
माधव सृष्टी या कंपनीने देशी गायींच्या तूपावर आधारित काही विशेष उत्पादने सादर केली आहेत. या कंपनीचा मुख्य उद्देश म्हणजे देशी गायींच्या सवर्धन आणि प्रजननास प्रोत्साहन देणे शिवाय त्यांच्या नैतिक आणि शाश्वत वापरातूनच उच्च गुणवत्ता असलेली उत्पादने निर्माण करणे. पुण्याच्या मोरगावजवळ त्यांचा देशी गाईंचा गोठा आहे.
माधव सृष्टीच्या उत्पादनांमध्ये मुख्यतः देशी गायीचे तूप वापरले जाते, ज्यामध्ये सोन्याचे सूक्ष्म अंश (गोल्ड सॉर्ट्स) सापडले आहेत. या तूपाचे फायदे त्वचेला आणि केसांना अत्यधिक लाभकारक आहेत.
तूपाचा वापर विविध स्किनकेअर आणि हेयरकेअर प्रोडक्ट्स मध्ये त्यांनी केला आहे. ज्यामध्ये बॉडी योगर्ट, सनस्क्रीन, मॉइश्चरायझर, स्किन ब्राइटिंग क्रीम, हेयर सिरम आणि टूथपेस्टसारखी उत्पादने समाविष्ट आहेत.
advertisement
तसेच माधव सृष्टीने आयुर्वेदिक वनस्पतींचा समावेश केला आहे ज्यात आगाढा सारख्या वनसप्तीचा वापर केला जातो. हे प्रोडक्ट्स पूर्णपणे नैसर्गिक आणि शरीरासाठी सुरक्षित आहेत. कंपनीने उटण्याचे सोप, पंचामृत सोप, लिक्विड लिपस्टिक आणि लिपबामसारखी नवीन उत्पादने सुद्धा बाजारात आणली आहेत.
advertisement
डॉ. मेघना दलाल माधव सृष्टीच्या संस्थापक, सांगतात की त्यांच्या सर्व प्रोडक्ट्स एफडीए अप्रुव्ड आणि लायसन्स प्राप्त आहेत त्यामुळे ते पूर्णपणे सुरक्षित आहेत. त्यांची किंमत १०० रुपये ते ३००० रुपये दरम्यान आहे जे विविध ग्राहकांच्या आवश्यकता आणि बजेटला अनुरूप आहेत.
माधव सृष्टीने देशी गायींच्या तूपाचे उत्पादन आणि पंचगव्यच्या प्रोडक्ट्सना अधिक मान्यता मिळवून देण्याचे आपले ध्येय ठेवले आहे. त्यांच्या उच्च गुणवत्ता असलेल्या प्रोडक्ट्सची खरेदी ग्राहक www.madhavsrushti.com या वेबसाइटवर जाऊन करू शकतात. याशिवाय कंपनी कॉर्पोरेट आणि फेस्टिव गिफ्टिंगसाठी विशेष पॅकेजेस देखील उपलब्ध करून देते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 22, 2025 4:25 PM IST