नेमके काय घडले?
मिळालेल्या माहितीनुसार, गावावरून शहरात शिक्षणासाठी आलेली एक तरुणी मुख्य क्रांती चौकातून जात असताना एका अनोळखी तरुणाने तिचा पाठलाग सुरू केला. तरुणाने तरुणीजवळ जाऊन तिला वारंवार पैशांची विचारणा केली आणि तिच्याकडे पाहून विचित्र हावभाव करत तिची छेड काढण्याचा प्रयत्न केला. त्याने 'पैसे घे आणि माझ्यासोबत चल' असे बोलून तिला त्रास देण्यास सुरुवात केली.
advertisement
तरुणीने दिला चोप, पोलिसांनी केली मदत
या माथेफिरूच्या कृत्याला कंटाळून आणि त्याचे गैरवर्तन पाहून तरुणीने धाडस दाखवले. तिने तातडीने त्या माथेफिरू तरुणाला भर चौकात जाब विचारला. मदतीला लोकांना बोलवलं. दरम्यान, हा प्रकार वाहतूक पोलीस, दामिनी पथक आणि क्रांती चौक पोलिसांच्या निदर्शनास आला. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे तरुणीची सुखरूप सुटका करण्यात आली. तरुणीच्या हिमतीमुळे आणि पोलिसांच्या जलद कारवाईमुळे तरुणीसोबत घडणारी गंभीर घटना थांबली. क्रांती चौक पोलिसांनी छेडछाड करणाऱ्या तरुणाला तत्काळ ताब्यात घेतले आहे. यावेळी पोलिसांनी आरोपीला तरुणीच्या पाया पडायला भाग पाडलं. तसेच चोपही द्यायला लावला. यावेळी संतापलेल्या तरुणीने आरोपीच्या कानशिलात लगावल्या.
