पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या परिसरात ही घटना घडली. सप्टेंबर महिन्यात नवी मुंबई परिसरात एक वृद्ध इसमाची शेअर मार्केटमध्ये कमी पैसे गुंतवून त्या बदल्यात अधिकचा आर्थिक नफा मिकवण्याचे आमिष दाखवून तब्बल १ कोटी ७ लाखांना फसवणूक केली होती. या प्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर नवी मुंबई सायबर पोलिसांनी मोठ्या शिताफीने या टोळीला जेरबंद केलं आहे.
advertisement
लॉजवर सुरू होतं कांड
ही टोळी नवी मुंबईतील वाशी येथील परिसरात लॉजमध्ये राहून सोशल मीडियावर लोकांना आपल्या जाळ्यात अडकवत होती. सोशल मीडियावर शेअर मार्केटमध्ये झटपट पैसा मिळवून देतो असं सांगणाऱ्या पोस्ट करत होते. ही टोळी लोकांना आपल्या जाळ्यात अडकवत होते. त्यानंतर टेलिग्राम, व्हॉट्सएअपवर ग्रुपमध्ये लोकांना अॅड करत होते. त्यानंतर शेअर मार्केटच्या टिप्स देत होते.
चीन आणि कंबोडियामध्ये पैसे ट्रान्सफर
ही टोळी लोकांकडून पैसे लुटत होती. त्यानंतर हे पैसे वेगवेगळ्या बँक खात्यात जमा करत होते. त्यानंतर हे पैसे चीन आणि कंबोडिया इथं असलेल्या गुन्हेगारांच्या खात्यात पैसे पाठवत होते. अखेरीस नवी मुंबई पोलिसांनी वाशीतील अनेक लॉजवर छापा टाकला आणि लुबाडणाऱ्या टोळीला सायबर गुन्हे शाखेनं अटक केली. या टोळीने एका इसमाचे 1 कोटी 7 लाख रुपये लुबाडले होते.
1 कोटी पैकी 32 लाख रुपये जप्त
पोलिसांनी तांत्रिक तपास करून ज्या खात्यावर पैसे जमा केले जात होते त्यांना आधीच ताब्यात घेतलं. त्यांच्याकडे अधिक चौकशी करून नवी मुंबईतील जवळपास 35 ते 40 लॉज पिंजून काढून 7 आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. फसवणूक झालेल्या रक्कमेपैकी 32 लाख 50 हजार रुपये गोठवण्यात सायबर गुन्हेशाखेला यश आलं आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.
