राणा जगजितसिंह आणि ओमराजे निंबाळकर यांच्यातील राजकीय मतभेद वैर जिल्ह्यात चर्चेत असते. काही दिवसांपूर्वीच एका सभेत बोलताना राणा जगजितसिंह यांनी ओमराजे निंबाळकरांवर टीकास्त्र सोडले होते. मी बारा गावचा पाटील व तेर गावचा रहिवाशी तरीदेखील माझ्या गाड्या उत्पन्न काढतात, असे म्हणत राणा पाटील यांनी ओमराजे यांच्यावर टीका केली होती. त्य़ाशिवाय, ठाकरे गटाचं निवडणूक चिन्ह मशाल कसली ही तर आइस्क्रिमची कँडी असल्याचे राणा पाटील यांचे चिरंजीव मल्हार पाटील यांनी म्हटले होते.
advertisement
रविवारी एका सभेत बोलताना ओमराजे निंबाळकर यांनी भाजप आमदार राणा पाटील व त्यांचे पुत्र मल्हार पाटील यांच्यावर पुन्हा एकदा जोरदार हल्ला चढवला. तू कशाचा पाटील तुला निंबाळकर आतून पाटील घराण्यात दत्तक दिले तुझ्या आज्याला माझ्या आज्यानं कोर्टात केस लढून पैसे खर्च करून तिथं पाटील म्हणून बसवलंय आणि त्याला पैसेही निंबाळकराचेच खर्च झालेत असं म्हणत राणा पाटील यांना प्रत्युत्तर दिले.
मशाल की आइस्क्रिम कँडी? तोंडात घेऊन बघ मग कळेल...
राणा पाटील यांचे पुत्र मल्हार पाटील यांना मल्लू म्हणत ओमराजेंनी हिणवलं. मल्लू म्हणतोय की मशाल चिन्ह आईस्क्रीमची कँडी आहे. ती आईस्क्रीमची कँडी आहे तर तोंडात घेऊन बघ गार लागतंय का तोंड पोळतोय, मग तुला समजल असं म्हणत त्यांनी मल्हार पाटील यांच्यावर तोफ डागली.
राणा जगजितसिंह पाटील काय म्हणाले होते?
मी तेर गावचा असून बारा गावचा पाटील आहे त्यामुळे माझ्याकडे गाड्या असणारच विरोधकाकडे बोलायला व प्रचार करायला मुद्दे नसतात त्यामुळे ते माझ्या गाड्या कडे येतात पण त्यांना माहिती नाही की काय मी तीर गावचा व बारा गावचा पाटील आहे ते कोण आहेत मी त्यांच्याविषयी बोलणार नाही अशी टीका भाजप आमदार राणा जगजीत सिंह पाटील यांनी म्हटले होते.
