हराळवाडी गावातील शेतकरी ज्ञानेश्वर आत्माराम हिप्परकर हे गेल्या अनेक वर्षापासून सात गुंठ्यामध्ये कांद्याची लागवड करत आहे. पावसाळी व्हरायटीचा पंचगंगा एक्सपोर्ट कांद्याची लागवड ज्ञानेश्वरांनी केली आहे. पाच फुटाचा बेड सोडून ज्ञानेश्वर यांनी कांद्याची लागवड केली आहे. कमी गुंठ्यात शेती करत असताना कामगारावर अवलंब न राहता शेती करता येते. साधठ्यामध्ये कांद्याची लागवड करत असताना ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर चा मुलगा आणि पत्नी यांच्या मदतीने या कांद्याची लागवड केली आहे. सात गुंठ्या मधून ज्ञानेश्वर हिप्परकर यांना 30 ते 35 क्विंटल कांदा होतो. ज्ञानेश्वर यांनी यावर्षी पाऊस अधिक असल्यामुळे कांद्याची लागवड बेडवर केली आहे. पाऊस जरी आला तर सरीमध्ये पाणी थांबून पाण्याचा योग्य पद्धतीने निचरा करण्यास मदत होते म्हणून त्यांनी बेडवर कांद्याची लागवड दरवर्षी करत आहे.
advertisement
सात गुंठ्यामध्ये कांद्याचे लागवडीसाठी पाच ते दहा हजार रुपये पर्यंत खर्च आला आहे. तर सर्व खर्च वजा करून 80 हजार ते 1 लाखाचे उत्पन्न शेतकरी ज्ञानेश्वर हिप्परकर यांना मिळणार आहे. ज्ञानेश्वर हिप्परकर यांच्याकडे सहा एकर शेती आहे. पण ज्ञानेश्वर हिप्परकर हे सहा ते आठ गुंठ्यात वेगवेगळे पालेभाज्या पिकं घेऊन शेती करत आहे. कमी गुंठ्यात अधिक पीक घेतल्याने दर आठवड्याला पालेभाज्याची तोडणी करून स्वतः आठवडी बाजारात विक्रीसाठी नेतात. सहा एकर शेती असूनही सहा ते आठ गुंठ्यामध्ये शेती करण्याचा एकच उद्देश आहे तो म्हणजे सहजासहजी मालाची तोडणी करून बाजारात विक्री करता येते. तसेच बाहेरून कोणताही मजूर लागत नाही. घरच्यांच्या मदतीने तोडणी करून बाजारात विक्रीसाठी सहजा सहज घेऊन जाता येते. तोडणीसाठी लागणारा मजुरांचा खर्चही वाचतो यामुळे उत्पन्न देखील अधिक मिळतो. शेतकऱ्यांनी शेतीचे योग्य नियोजन करून शेती केल्यास चांगलं उत्पन्न मिळेल असा सल्ला प्रयोगशील शेतकरी ज्ञानेश्वर हिप्परकर यानी दिला आहे.