TRENDING:

Latur : 'शेतकऱ्यांनी शेतीमुळे अजिबात जीव दिला नाही', पद्मश्री जाहीर झालेल्या दादा लाड यांचं विधान, म्हणाले...

Last Updated:

शेती हे आत्महत्या करण्याचं क्षेत्र नाही. आनंदाने जगण्याचं क्षेत्र आहे. आत्महत्या या शेतीमुळे अजिबात झाल्या नाही.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
शशीकांत पाटील, प्रतिनिधी
News18
News18
advertisement

लातूर : कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल परभणी येथील श्रीरंग उर्फ दादा लाड यांना मानाचा पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. मात्र, पुरस्कार जाहीर झाल्यानंतर लातूरमध्ये News18 मराठीशी संवाद साधताना दादा लाड यांनी शेतकरी आत्महत्यांबाबत केलेल्या काही विधानांमुळे वाद निर्माण झाला आहे. "शेती हे आत्महत्या करण्याचं क्षेत्र नाही. आनंदाने जगण्याचं क्षेत्र आहे. आत्महत्या या शेतीमुळे अजिबात झाल्या नाही" असा दावा लाड यांनी केला.

advertisement

शेतीमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या कधीच होत नाहीत, आत्महत्येला इतर कारणे जबाबदार असतात. मग आत्महत्या शेतीच्या खात्यावर का जमा केल्या जातात? असा सवाल उपस्थित करत, शेतकऱ्यांनी आत्महत्येलाही प्रतिष्ठा मिळवून दिली आहे, असं  विधान दादा लाड यांनी केलं.

तसंच, शेतीमालाला योग्य भाव मिळत नसला तरी शेतकरी उपाशी मरत नाही, शेतकऱ्यांनी राजकारण करू नये, राजकीय पक्षांचे गुलाम होण्याऐवजी शेतकऱ्यांनी शेतीचं गुलाम व्हावं, असं यावेळी दादा लाड म्हणाले.

advertisement

काय म्हणाले दादा लाड? 

मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात, प्रमाण वाढत चाललं आहे, त्यांनाा काय सांगणार अशी विचारणा केली असता, दादा लाड म्हणाले की, "माझं निरळं मत आहे, मराठवाड्याला पर्याप्त इथं पाणी पडतं. मला अतिशय दु:ख होतं, शेतीमुळे आत्महत्या होत नाही,  हे शेतीच्या खात्यावर का टाकतात. आत्महत्या झालेल्या शेतकऱ्याच्या गावात गेलो, असं लक्षात आलं की, आत्महत्येला कारण निराळं होतं, पण शेतीच्या खात्यावर आत्महत्या जमा केली. आत्महत्येलाही त्यांनी प्रतिष्ठाप्राप्त करून दिली. अतिशय वेदना आहे. शेती हे आत्महत्या करण्याचं क्षेत्र नाही. आनंदाने जगण्याचं क्षेत्र आहे. आत्महत्या या शेतीमुळे अजिबात झाल्या नाही. पण, मध्यंतरी कर्जामुळे आत्महत्या झाल्याची प्रकरण आहे. पण, शेतीला  बदनाम करण्याचं काम या सगळ्यांनी केलं आहे. आत्महत्या करावे असं चित्र नाही. हजारो वर्ष आम्ही शेती करतोय. तो दुष्काळात सापडला, उत्पन्न घटलं, पण आत्महत्याा केली नाही. आत्महत्या करून जीवन संपवणं हे एका टोकाचं घडावं लागतं, पण शेती हे आत्महत्येचं कारण नाही."  असं दादा लाड म्हणाले.

advertisement

शेतकऱ्यांनी राजकारण करू नये

भाव मिळत नाही म्हणजे, घरात वैभव मिळत नसेल. भाव हा गयावया करून मिळत नाही. शेतकरी कष्ट करतो, उत्पन्न वाढवतो. वाढवलेल्या उत्पन्नावर भाव घेण्याची शेतकऱ्याची मानसिकता नाही. म्हणून, दुर्दैव असं आहे की आपल्याकडे लोकशाही आली हे चांगली आहे. शेतकऱ्यांनी राजकारण करू नये, ज्याला कुणाला मतदान करायचे ते करावे,  पण पक्षाचं गुलाम होण्यापेक्षा शेतीचं गुलाम झालं पाहिजे, जोपर्यंत शेतकरी संघटीत होत नाही, तोपर्यंत कोणतीही सरकार शेतीला भाव देणार नाही, असंही दादा लाड म्हणाले.

advertisement

"सरकारकडे हमीभावासाठी मागणी केली"

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीन आणि कांद्याच्या दरात पुन्हा घट, कपाशीला किती मिळाला भाव?
सर्व पहा

"भारतीय किसान संघाचा कार्यकर्ता आहे. संघटनेची त्रिसूत्री काम आहे. संघटन, संघर्ष आणि संरचना, माझं काम हे संरचनेत येतो. संघर्षाचाा पाया असतो संघटना मजबूत असेल तर  वाद होत नाही. जोपर्यंत पर्याप्त ताकद दिसणार नाही, गावात म्हण आहे शक्तीने प्रश्न सुटतात. त्यामुळे डोळ्यात अश्रू आणून काही होत नाही. एखाद्यावेळी कुणी दया दाखवले, कायम स्वरुपी प्रश्न सोडवायचे असेल तर समोरच्या नमवण्याची ताकद पाहिजे. किसन संघटना ही बाल्य अवस्थेत आहे. आमची संस्था मोठी झाली तर हमीभावासाठी सरकारडे मागणी करू, असं दादा लाड म्हणाले.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Latur : 'शेतकऱ्यांनी शेतीमुळे अजिबात जीव दिला नाही', पद्मश्री जाहीर झालेल्या दादा लाड यांचं विधान, म्हणाले...
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल