TRENDING:

दुकानात गेल्या अन् नराधमाच्या तावडीत सापडल्या, पंढरपुरात 2 अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार

Last Updated:

सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातून एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. किराणा दुकानात सामान खरेदी करण्यासाठी गेलेल्या दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार करण्यात आला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
वीरेंद्रसिंह उत्पाट, प्रतिनिधी पंढरपूर: सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातून एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. किराणा दुकानात सामान खरेदी करण्यासाठी गेलेल्या दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणातील आरोपी देखील अल्पवयीन असल्याचं समोर आलं आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
News18
News18
advertisement

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित दोन अल्पवयीन मुली गावातील एका किराणा दुकानात काही वस्तू खरेदी करण्यासाठी गेल्या होत्या. याच संधीचा फायदा घेऊन दुकानातील एका अल्पवयीन मुलाने या दोन्ही मुलींवर अत्याचार केला. ही घटना दुकानाच्या परिसरातच घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.

आईच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल

मुलींनी घडलेला प्रकार आपल्या पालकांना सांगितल्यानंतर हे गंभीर प्रकरण उघडकीस आले. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने तातडीने पोलीस ठाण्यात धाव घेतली. आईच्या फिर्यादीवरून पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात संबंधित अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी संशयित अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतलं आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
ऊन तापलंय अन् थंड प्यायचंय? 5 मिनिटांत बनवा चिकू शेक, सोपी अन् हेल्दी रेसिपी Vid
सर्व पहा

पोलीस आता या प्रकरणाचा अधिक सखोल तपास करत असून, घटनेच्या वेळी दुकानात इतर कोणी होते का किंवा अशा प्रकारचे कृत्य वारंवार घडत होते का, याचाही शोध घेतला जात आहे. अल्पवयीन मुलांकडूनच असं कृत्य घडल्याने परिसरात चिंतेचं वातावरण आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
दुकानात गेल्या अन् नराधमाच्या तावडीत सापडल्या, पंढरपुरात 2 अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल