TRENDING:

पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणातील निलंबित तहसीलदार मीडियासमोर, 'तो' दावाच फेटाळला, परवानगी कुणी दिली?

Last Updated:

Tehsildar Suryakant Yewale: पार्थ पवार जमीन घोटाळ्याशी संबंधित प्रकरणात निलंबनाची कारवाई झालेले तहसीलदार सूर्यकांत येवले यांनी माध्यमांसमोर येऊन आपली बाजू स्पष्ट केली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्याशी संबंधित पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणात तहसीलदार सूर्यकांत येवले तत्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले आहेत. तहसीलदार सूर्यकांत येवले यांच्या निलंबनाचा प्रस्ताव २० ऑक्टोबरलाच महसूल विभागाकडे गेला होता. पण त्यांच्यावरील कारवाई रोखून धरण्यात आली. परंतु पार्थ पवार यांच्या जमीन घोटाळ्याचे प्रकरण माध्यमांनी उचलून धरल्यानंतर अखेर महसूल विभागाकडून तहसीलदार येवले यांच्या निलंबनाचे आदेश जारी करण्यात आले.
अजित पवार-पार्थ पवार-तहसीलदार येवले
अजित पवार-पार्थ पवार-तहसीलदार येवले
advertisement

या सगळ्या प्रकारानंतर तहसीलदार येवले यांनी माध्यमांसमोर येत आपली बाजू स्पष्ट करण्यात आली. मी असा कोणताही व्यवहार केला नाही. पार्थ पवार जमीन व्यवहाराशी माझा कोणताही संबंध नाही, असे म्हणत आपल्यावरील आरोपांचे खंडन करण्याचा प्रयत्न तहसीलदार येवले यांनी केला.

ती फाईल माझ्याकडे आलीच नाही, तहसीलदार येवलेंचा मोठा दावा

माझ्यापर्यंत निलंबनाची कोणतीही माहिती आली नाही. पार्थ पवार प्रकरणात मी कोणताही व्यवहार केलेला नाही, मला याबद्दल काहीच माहिती नाही, असे तहसीलदार येवले म्हणाले. तसेच जमीन व्यवहाराला आमच्याकडून कोणतीही परवानगी देण्यात आलेली नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच परवानगी कुणी दिली, कोणत्या विभागाने दिली याची मला कल्पना नसल्याचे ते म्हणाले. माझ्यावर कोणत्या कारणाने कारवाई केली, हे देखील मला माहिती नाही. माझ्यापर्यंत निलंबनाचा आदेश आल्यानंतर अधिक बाबी स्पष्ट होतील, असे ते म्हणाले.

advertisement

तो दस्तच मी पाहिला नाही

पार्थ पवार यांच्या संबंधाने माझ्याकडे कोणतीच फाईल आली नाही. जमीन व्यवहार प्रस्तावितही झाला नाही. जमीन खरेदीचा जो व्यवहार झाला किंवा दस्त झाला तो सब रजिस्टरच्या अंतर्गत विषय येतो. या प्रकरणात माझ्यावर कोणत्या कारणाने कारवाई झाली, याची मला कल्पना नाही, असे सांगत शासनाच्या कारवाईविषयी त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. तसेच जमीन व्यवहाराचा दस्तच मी पाहिला नसल्याचे तहसीलदार येवले म्हणाले.

advertisement

बड्या धेंडांना वाचविण्यासाठी तुम्हाला बळीचा बकरा बनवणे सुरू आहे का?

महार वतनाची भोगवटा २ पद्धतीची जमीन असल्याने वरिष्ठ स्तरावरील परवानगीशिवाय जमिनीचा व्यवहार होणे शक्य नाही. त्यामुळे अतिरिक्त जिल्हाधिकारी किंवा उपजिल्हाधिकारी यांच्या पातळीवरून काही आदेश दिले गेले आहेत का? बड्या धेंडांना वाचविण्यासाठी तुम्हाला बळीचा बकरा बनवणे सुरू आहे का? असे प्रश्न तहसीलदार येवले यांना विचारण्यात आले असता, मला पार्थ पवार यांच्या जमीन व्यवहाराविषयी काहीच माहिती नाही, अगदी परवानगी कुणी दिली याचीही कल्पना नसल्याने मी यासंबंधाने अधिक भाष्य करू शकत नाही, असे म्हणत त्यांनी बोलणे टाळले.

advertisement

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी माहिती मागवली होती?

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोलापूरकरांनो सावधान, विमानतळ परिसरात पतंग उडवताय? होणार कारवाई
सर्व पहा

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याआधी तुमच्याकडून काही माहिती मागवली होती का? असे विचारली असता, माझ्याकडून कोणतीही माहिती मागविण्यात आलेली नाही. तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी देखील कुठल्याही संबंधाने मला विचारणा केलेली नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणातील निलंबित तहसीलदार मीडियासमोर, 'तो' दावाच फेटाळला, परवानगी कुणी दिली?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल