TRENDING:

Pandharpur: पिकअप व्हॅन समोरून आली अन् दुसरी व्हॅन बाजूला झाली, वारकऱ्यांच्या गाडीवर आदळली, LIVE VIDEO

Last Updated:

या अपघातात ८ ते १० वारकरी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
विरेंद्र उत्पात, प्रतिनिधी
News18
News18
advertisement

करमाळा : पंढरपूरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.  करमाळा जातेगाव रस्त्यावर वारकऱ्यांना घेऊन जाणाऱ्या पीकअप गाडी आणि पिकअप व्हॅनची समोरासमोर धडक झाली आहे. या अपघातात ८ ते १० वारकरी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

advertisement

मिळालेल्या माहितीनुसार, करमाळा जातेगाव रस्त्यावर शनिवारी संध्याकाळी ५.१५ वाजेच्या सुमारास हा अपघात घडला.  सदरची घटना जातेगाव रस्त्यावर कामोणे फाटा परिसरात घडली आहे, वारकऱ्यांना घेऊन जाणाऱ्या पिकअपचा तसंच स्थानिक गाडीतून माशांसाठी खाद्य घेऊन जाणाऱ्या पीकअपचा समोरासमोर धडक झाली. माशांचं खाद्य घेऊन जाणाऱ्या पिकअप व्हॅन चालकाचं अचानक नियंत्रण सुटलं आणि व्हॅनने लेन बदली.

advertisement

समोर येणाऱ्या एका पिकअप व्हॅनवर ही पिकअप व्हॅन आदळणार होती. पण समोरील पिकअप व्हॅनचालकाने लगेच आपली गाडी रस्त्याच्या खाली उतरवली. पण मागून येणाऱ्या वारकऱ्यांच्या वाहनचालकाला ही पिकअप व्हॅन दिसली नाही. अवघ्या काही सेंकदात ही पिकअप व्हॅन आणि वारकऱ्यांच्या गाडीची समोरासमोर धडक झाली. हा सगळा प्रकार रस्त्याच्या लगत असलेल्या एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला.

advertisement

समोरासमोर धडक झाल्याने दोन्ही वाहनांचं प्रचंड नुकसान झालं. या अपघातात आठ ते दहा वारकरी जखमी झाले असून उपचारासाठी त्यांना करमाळा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  स्थानिक लोकांच्या आणि पोलिसांच्या मदतीने जखमींना उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Pandharpur: पिकअप व्हॅन समोरून आली अन् दुसरी व्हॅन बाजूला झाली, वारकऱ्यांच्या गाडीवर आदळली, LIVE VIDEO
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल