TRENDING:

आपापसात सेटिंग करू नका, काटेंच्या भावकीतल्या कथित छुप्या युतीवर रविंद्र चव्हाणांचा इशारा

Last Updated:

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी शहरातील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचाराचा नारळ फोडला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
गोविंद वाकडे, प्रतिनिधी, पिंपरी चिंचवड : भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना स्पष्ट इशारा दिला आहे. निधी थेट मिळवायचा असेल तर भाजपलाच निवडा, असे विधान करत त्यांनी एकप्रकारे मतदारांना निधीचे प्रलोभन दाखवले आहे. दुसरीकडे अंतर्गत सेटिंग करणाऱ्या नेत्यांचे कान टोचले आहेत.
पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक
पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक
advertisement

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी शहरातील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचाराचा नारळ फोडला. कोणाच्या जीवावर कोण काय म्हणतंय याकडे लक्ष देऊ नका. आपण रोज सरळ हाताने जेवतो की उलट? जर विकासकामांसाठी थेट निधी हवा असेल, तर भाजपला निवडून देणे हाच एकमेव मार्ग आहे, असे रविंद्र चव्हाण म्हणाले. त्यांचा रोख अजित पवार यांच्याकडे होता, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. दुसरीकडे विरोधकांनी याला प्रलोभन असल्याचे म्हटले आहे.

advertisement

सेटिंग करणाऱ्यांना इशारा

शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे आणि राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) नाना काटे यांच्यातील कथित छुप्या युतीवरही त्यांनी निशाणा साधला आहे. एकाच प्रभागातून लढताना दोन भाजप आणि दोन राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून आणण्याच्या सेटिंगच्या चर्चेवर चव्हाण चांगलेच संतापले आहेत. या विधानामुळे स्थानिक पातळीवरील गटबाजी आणि छुप्या युतीला चाप बसणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

advertisement

अजिबात शायनिंग मारायची नाही, सेटिंगही करायची नाही, रविंद्र चव्हाण यांची तंबी

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
यंदा मकर संक्रांतीला बनवा स्पेशल तीळ पापडी, कमी साहित्यात बनेल खास रेसिपी, Video
सर्व पहा

अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा प्रमुख चेहरा असलेल्या नाना काटे यांच्याविरोधात निवडणूक लढवणे भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी टाळले. नाना काटे हे पिंपळे सौदागरच्या प्रभाग क्रमांक २८ मधून निवडणूक लढवित आहेत. मात्र त्यांच्यासमोर निवडणूक लढवणे शत्रुघ्न काटे यांनी मुद्दाम टाळल्याची चर्चा आहे. त्याचवेळी पॅनेलच्या बाहेर जाऊन कुणीही स्वतंत्रपणे प्रचार करण्याचा प्रयत्न करू नये. अजिबात शायनिंग मारायची नाही. सेटिंगही करायची नाही. पॅनेलच्या उमेदवारच निवडून आणायचे, अशी तंबी रविंद्र चव्हाण यांनी दिली. त्यांचा रोख शत्रुघ्न काटे यांच्याकडे होता, अशी चर्चा शहराच्या राजकीय वर्तुळात आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
आपापसात सेटिंग करू नका, काटेंच्या भावकीतल्या कथित छुप्या युतीवर रविंद्र चव्हाणांचा इशारा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल