Makar Sankranti Recipe : यंदा मकर संक्रांतीला बनवा स्पेशल तीळ पापडी, कमी साहित्यात बनेल खास रेसिपी, संपूर्ण Video
- Reported by:Pooja Satyavan Patil
- Published by:Mohan Najan
Last Updated:
नव्या वर्षातील पहिला सण म्हणजे मकर संक्रांती. मकर संक्रांतीला तीळाला खूप महत्त्व असते. या दिवशी तिळापासून अनेक पदार्थ बनवले जातात.
पुणे : नव्या वर्षातील पहिला सण म्हणजे मकर संक्रांती. मकर संक्रांतीला तीळाला खूप महत्त्व असते. या दिवशी तिळापासून अनेक पदार्थ बनवले जातात. तिळाचे लाडू, तिळाची पोळी, तिळाची वडी असे पदार्थ संक्रांतीला खास असतात. मकर संक्रांतीच्या निमित्ताने आज आपण तिळापासून बनणारा एक सोपा, झटपट आणि खूप चविष्ट पदार्थ पाहणार आहोत. हा पदार्थ म्हणजे राजस्थान स्पेशल तीळ पापडी. अगदी मोजक्या साहित्यात हा पदार्थ तयार होतो. वसुंधरा पाटुकले यांनी ही मकर संक्रांत स्पेशल रेसिपी बनवून दाखवली आहे.
राजस्थान स्पेशल तीळ पापडी साहित्य
राजस्थान स्पेशल तीळ पापडी बनवण्यासाठी अगदी मोजकं साहित्य लागतं. कमी साहित्यात हा पदार्थ तयार होतो. साखर, तीळ, तूप आणि पिस्ता एवढ्या साहित्यातून ही चविष्ट राजस्थान स्पेशल तीळ पापडी तयार करता येते.
advertisement
राजस्थान स्पेशल तीळ पापडी कृती
view commentsसुरुवातीला तीळ चांगले भाजून घ्या. तीळ भाजून झाल्यावर ते प्लेटमध्ये काढून गार होऊ द्या. आता पिस्ते बारीक चिरून घ्या. तीळ पापडी लाटण्यासाठी किचन कट्ट्यावर आणि लाटण्याला थोडंसं तूप लावून ठेवा. पॅन गरम झाल्यावर त्यामध्ये साखर घाला. साखर सतत ढवळत राहा आणि ती पूर्णपणे वितळवून घ्या. साखर वितळताना गॅसची फ्लेम मंद ठेवा. साखर पूर्ण वितळल्यानंतर त्यामध्ये भाजलेले तीळ घालून चांगलं मिक्स करा. यानंतर थोडे पिस्त्याचे तुकडे घाला आणि पुन्हा मिक्स करा. लगेचच मिश्रण पातळ लाटून घ्या. लाटून झाल्यावर अशा प्रकारे तुमची राजस्थानी स्पेशल तीळ पापडी तयार होते.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Jan 05, 2026 4:33 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/रेसिपी/
Makar Sankranti Recipe : यंदा मकर संक्रांतीला बनवा स्पेशल तीळ पापडी, कमी साहित्यात बनेल खास रेसिपी, संपूर्ण Video







